
तमाशा कार्यक्रमास परवानगी व मदत द्या अन्यथा आत्मदहन!
तमाशा कलावंत व सिने अँक्टर नितीन बनसोडे यांचा इशारा
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
महाराष्ट्र सरकारने लोकडाऊन मुळे बंद असलेल्या तमाशा कलावंतांना किमान जगण्यापुरते मानधन अथवा आर्थिक मदत दिली नाही. गृह मंत्रालयाने परवानगी देऊन ही संबंधित तालुक्यातील पोलीस स्टेशन आमच्या या कार्यक्रमास परवानगी नाकारत असल्याचा आरोप लोक नाट्य तमाशा कलावंत व सिने अँक्टर नितीन बनसोडे यांनी केला आहे.
शासनाने तातडीने यात लक्ष घालून तमाशा कलावंताची होत असलेली हेळसांड थांबवावी, कलावंतांची गेल्या दोन वर्षांपासून होत असलेली आर्थिक कुचंबणा थांबवावी,त्यांना किमान जगण्यापूरते मानधन द्यावे,सरकारने कार्यक्रम घेण्यास परवानगी दिली असताना स्थानिक पोलीस स्टेशन ने त्यांची अडवणूक करू नये,लोक कला बुडवू नयेत या करिता लोक नाट्य तमाशा संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव येत्या 15 डिसेंबर 2021 रोजी कऱ्हाड येथे आत्मदहन करणार आहेत.
तमाशा कालावंतावर आत्मदहन करण्याची वेळ येऊ नये, त्या पासून त्यांना परावृत्त करावे,याकरिता शासनाने तमाशा कलावंताच्या मागण्या पूर्ण कराव्यात,या आत्मदहन प्रसंगी आमचाही निर्णायक पाठिंबा राहील,असे नितीन बनसोडे यांनी सांगितले आहे.
मंगलाताई बनसोडे यांचा इशारा:-
सध्या राज्यात चित्रपट गृहे, लावण्याची थेटर्स, जागरण गोंधळाचे कार्यक्रम,कला पथकाचे कार्यक्रम,संगीत पार्ट्या, नाटकाचे प्रयोग हाऊसफुल्ल चालू आहेत, मग तमाशा कलावंतांनाच का रोखले जाते आहे, या बाबी गंभीर आहेत,शासनाने तमाशा कार्यक्रम व तमाशा कलावंताची पिळवणूक व अडवणूक थांबवावी असा इशारा शिव कल्याण न्युज पोर्टलचे संपादक शहाजीराजे भोसले व कार्यकारी संपादक सचिन तरंगे यांनी करवडी येथील निवासस्थानी भेट घेतली असता त्या प्रसंगी कलावंत नितीन बनसोडे यांनी मत व्यक्त केले.
