Thu. Apr 23rd, 2026

जिल्हा बँकेच्या निवडणूकीत राज्यमंत्र्यांनी त्यांचे बंधू “मधुकर भरणे”यांना उमेदवारी द्यावी! सर्व सामान्य कार्यकर्त्यांना “बळी”चा बकरा बनवू नये, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत चर्चा

Spread the love

जिल्हा बँकेच्या निवडणूकीत राज्यमंत्र्यांनी त्यांचे बंधू “मधुकर भरणे”यांना उमेदवारी द्यावी!
सर्व सामान्य कार्यकर्त्यांना “बळी”चा बकरा बनवू नये, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत चर्चा

सचिन तरंगे ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

राज्यातील अत्यंत प्रतिष्ठित अशा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक डिसेंबर2021मध्ये होत आहे. या बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे,

या बँकेवर सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,आमदार संजय जगताप,अशोक पवार, संग्राम थोपटे,माजी आमदार रमेश थोरात,तसेच जिल्ह्यातील अनेक माताबर या बँकेत संचालक आहेत।

इंदापूर ची सोसायटी मतदार संघातील निवडणूक ही 1995 पासून अत्यंत चुरशीची व निर्णायक झाली आहे,

1995 ते 2009 पर्यंत राज्याचे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी इंदापूर ची जागा प्रतिस्थेची केली होती,काहीही करून अजित पवार यांना तत्कालीन मंत्री व सध्याचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या विचाराच्या कार्यकर्त्यास बँकेत एण्ट्री नको होती,म्हणून त्यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे ‘मामा’आप्पासाहेब जगदाळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन ‘राजकिय हादरा’दिला, तेव्हा पासून ते आज पर्यंत हर्षवर्धन पाटील यांचा प्रतिनिधी जिल्हा बँकेवर नाही.

सध्या आप्पासाहेब जगदाळे हे मागील विधानसभे पासून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आप्पासाहेब जगदाळे याना सोबत घेऊन पाटील यांचा 2014 ची विधानसभा निवडणूकीत ‘काँग्रेस पक्षाचे’ उमेदवाराचा प्रभाव करत विधानसभेत एंट्री केली,आप्पासाहेब जगदाळे यांच्या मदतीने आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, इंदापूर तालुका खरेदी विक्री संघ या सारख्या संस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात घेतल्या,पंचायत समिती व जिल्हा परिषद च्या निवडणूकित एकूण झालेल्या मतदानात आघाडी घेत काँग्रेस पक्षावर मात केली,तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत व सोसायटी च्या निवडणूकित बाजी मारली, हे केवळ ‘आप्पासाहेब जगदाळे’यांच्यामुळे झाले हे पक्ष श्रेष्ठी व राष्ट्रवादी काँग्रेस चांगलेत जाणून आहे.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि सध्याचे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्यात प्रचंड राजकीय संघर्ष आहे,

राज्यमंत्र्यांनी सहजा सहजी ताब्यात येणार ‘कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचा ‘ गढ’ निवडणूकीतून माघार घेत त्यांचे कट्टर विरोधक हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात दिला,इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील सहकारी साखर कार खाण्याची निवडणूकीचा’प्रोग्राम’जाहीर झाला, तेव्हा या कारखाण्याबद्दल एकही चकार शब्द काढला नाही,कार्यकर्ते निवडणूक लढविण्याचा तयारीत होते,कर्मयोगी वरील कर्जाचा उल्लेख करून निवडणूक लढविण्यास टाळाटाळ करीत बाजूला राहिले,इंदापूर च्या शेतकरी हितासाठी राज्यमंत्र्यांनी कर्मयोगी कारखाना निवडणूक लढवित शेतकरी यांना जादाचा ‘ऊस दर व वेळेत ऊस बिल’देण्याचा निर्णय घ्यायला हवा होता, अशी दांडगी व प्रामाणिक अपेक्षा शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांची होती,अशी अजून ही कारखान्याच्या कार्यक्षेत्रात चर्चा आहे,
कर्मयोगी चे ऊस दर कमी आहे आणि तो वेळेत मिळत नाही,कारखान्यावर प्रचंड कर्ज आहे,अश्या टीका राज्यमंत्री करतात परंतु शेतकरी हितासाठी मात्र ते कारखाना का ताब्यात घेत नाहीत,अशी ही चर्चा आहे.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा मागील विधानसभेत पराभव होऊन ही ते प्रत्येक संस्थेच्या ‘निवडणूकीत’सक्रिय आहेत,पण राज्यमंत्री मात्र अलिप्त राहत आहेत,हे कर्मयोगी व पंचायत समितीच्या उपसभापती निवडणूक कीत दिसून आले आहे,हीच बाब कार्यकर्त्यांना ‘खटखत’आहे.

सध्या इंदापूर तालुक्यात जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे, मागील विधानसभा निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांचा पराभव करण्याचा ‘राजकीय विडा’जिल्हा बँकेचे संचालक आपासाहेब जगदाळे यांनी उचलला होता,परंतु त्या मध्ये त्यांना अपयश आले.

या वेळी इंदापूर तालुक्यातून आप्पासाहेब जगदाळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोणाला उमेदवारी देणार याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व इंदापूर तालुक्यातील राजकीय तज्ज्ञांच्या त चर्चेचा विषय होत आहे,

आप्पासाहेब जगदाळे यांची जिल्हा बँकेतील एंट्री रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुखांना सक्षम व आक्रमक उमेदवार द्यावा लागणार आहे,

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून जगदाळे यांचा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत’राजकीय सामना’करण्यासाठी उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू आहे,

जिल्हा बँकेतील जगदाळे यांची एंट्री रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वतः राज्यमंत्री दत्तात्रय भरणे किंवा त्यांचे बंधू ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे (मामा)यांना उमेदवारी देण्यात यावी अशी जोरदार मागणी राजकीय वर्तुळात आहे,
सामान्य कार्यकर्त्यास उमेदवारी दिल्यास जगदाळे त्यांचा सहज पराभव करतील

या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभाव झाल्यास राज्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यास ‘बळी बकरा’बनविला हा ‘राजकीय संदेश जाऊ शकतो, येणाऱ्या पंचायत समिती ,जिल्हा परिषद आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ‘राजकीय फटका’बसू शकतो, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्ते यांना चांगलेच अवगत आहे

त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजमंत्र्यांनी स्वतः किंवा त्यांचे सक्षम व तालुक्यात दांडगा राजकीय संपर्क असणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व त्यांचे बंधू मधुकर भरणे(मामा)याना उमेदवारी जाहीर करावी,आणि जिल्हा बँकेतील जगदाळे यांची एंट्री रोखवी.अशी जोरदार चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात आहे,

जिल्हा बँकेच्या निडणुकीमुळे जगदाळे व भरणे यांच्यातील राजकीय संघर्ष तीव्र होणार आहेत,माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व आप्पासाहेब जगदाळे हे दोघे “मामा भाच्चे”
एकत्र आल्याने त्यांची जिल्हा बँकेतील एन्ट्री रोखण्यासाठी दत्ता(मामा) व मधुकर भरणे (मामा)यांनाच मैदानात उतरावे लागणार आहे,त्यामुळे इंदापुरात जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप च्या “मामा”विरुद्ध राष्ट्रवादी च्या”मामा”मधील लढत लक्षवेधी ठरणार आहे

अशातच पुणे जिल्हा परिषदेच्या
बांधकाम समितीचे माजी सभापती प्रवीण माने हे ही नाराज आहेत,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर ते दिसत नाहीत,याचाही ‘राजकीय फटका’बसू शकतो

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांची जिल्हा बँकेतील एंट्री रोखणार का?माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील ‘राजकिय पटलावर’कोणता ‘राजकीय डाव’टाकून जिल्हा बँकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एंट्री रोखतात ,की राज्यमंत्र्याकडून एखादा कार्यकर्ता “बळी बकरा”बनतो की काय ?या कडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निवडणूक सन 2021ते2026करीता जाहीर झाली आहे, निवडणूक साठी 6डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे आवश्यक आहे,

इंदापूर तालुक्यातून “अ”मतदार संघ तुन निवडणूक होत आहे

Related Post

error: Content is protected !!