Fri. Apr 24th, 2026

नागरी संरक्षण स्वयंसेवकांची नोंदणीस सुरूवात

Spread the love
  1. नागरी संरक्षण स्वयंसेवकांची नोंदणीस सुरूवात

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

मुंबई दि. 15- आपत्कालीन उपाययोजनेच्या दृष्टीकोनातून मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड व पालघर या सहा नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण स्वयंसेवकांची नोंदणी व पुनर्नोदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

नागरी संरक्षण दलाने आतापर्यंत अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी राज्य व राज्याबाहेर विमोचन व मदतकार्य केलेले आहे. नागरी संरक्षण दलाची व्याप्ती नागरी
संरक्षण शहरापुरती मर्यादित न ठेवता वाढविण्याचे धोरण आहे. त्यानुसार राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड व पालघर या नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण स्वयंसेवकांची नोंदणी व पुनर्र नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरु केली आहे.

नागरी संरक्षण दलामध्ये सामील होऊन देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी व पुनर्नोदणी करावी, असे आवाहन नागरी संरक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. के व्यंकटेशन यांनी केले आहे.

Related Post

error: Content is protected !!