विश्वासराव रणसिंग महाविद्यालयातील प्रा.डाॅ.हमीद काझी यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
कळंब, ता.इंदापूर येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयातील प्रा.डॉ. हमीद उमरली काझी हे 37 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर दिनांक 31-10- 2021 रोजी सेवानिवृत्त झाले .त्या निमित्त त्यांचा सेवापूर्ती समारंभ महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी , महाविद्यालयाचा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंकुशराव आहेर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकामध्ये त्यांनी प्रा.डॉ. हमीद काझी यांच्या प्रदीर्घ अशा 37 वर्षाच्या वाटचालीचा उल्लेख करत त्यांनी केलेल्या कामगिरीला उजाळा दिला. डॉ. काझी सरांच्या कामगिरीने या महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक वारसा जतन होण्यासाठी मदत झाली आहे. ते सुसंस्कृत होते.त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक जण आज कला क्षेत्रात चमकले असल्याचे त्यांनी नमुद केले. संस्थेच्या सर्व पदाधिका-यांचे स्वागत केल्यानंतर संस्थेचे नवनियुक्त उपाध्यक्ष माननीय श्री. प्रताप कदम आणि नवनियुक्त सचिव माननीय श्री. वीरसिंग रणसिंग यांचा विशेष सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अंकुशराव आहेर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर प्रा.डॉ.हमीद काझी, त्यांची सुविद्य पत्नी सौ.फरीदा काझी,मुलगी डाॅ.हिना काझी यांचा सत्कार संस्थेच्या वतीने माननीय अध्यक्ष श्रीमती आनंदीकाकी रणसिंग यांच्या हस्ते करण्यात आला. या शिवाय संस्थेचे खजिनदार श्री. हणमंतराव रणसिंग यांनी प्रा.डॉ. काझी व त्यांच्ये कुटूंबियांचा विशेष सत्कार केला, त्याशिवाय नातेपुते ग्रामपंचायतीचे सदस्य श्री.प्रकाश साळवे आणि माजी सदस्य श्री समीर सोरटे,मांडवे गावचे डाॅ.राजेन्द्र केंगार यांनीही प्रा.डाॅ.काझी सरांचा सत्कार केला. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी डॉ. हमीद काझी यांच्या वाटचाली विषयी मनोगत व्यक्त केले. डॉ. अरुण कांबळे यांनी त्यांच्या सांस्कृतिक विभागातील योगदान विशेषत्वाने नमूद केले. तसेच ते विद्यार्थिप्रिय शिक्षक असल्याचे व सर्व समावेशक व्यक्तिमत्व असल्याचे आवर्जून नमूद केले. त्यानंतर आपल्या मनोगतामध्ये प्रा. गुळीग यांनी आपल्या गुरूंविषयी अत्यंत संवेदनशील अशा भावना व्यक्त केल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या विचार प्रकाशामध्ये मी वाटचाल करतो आहे, आणि ती वाटचाल तशीच चालू राहणार आहे असे त्यांनी आपल्या मनोगतामध्ये नमूद केले. डॉ. विलास बुवा यांनी सरांच्या संशोधकीय वृत्तीवर प्रकाश टाकला .संशोधकीय बैठक आणि सत्यशोधकीय चिकित्सा हे सरांचे खास वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी आपल्या नमुद केले. सरांची विचारधारा यानंतरही पुढच्या पिढीला प्रेरणादायी ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यानंतर समाना काझी यांनी गाण्यातून डॉ. काझी सरांविषयी भावना व्यक्त केल्या. त्यांना श्री.प्रविण कुंभार गुरूजी यांनी तबल्याची साथ दिली. सत्काराला उत्तर देताना प्रा डाॅ.काझी यांनी आपल्या मागील 37 वर्षाचा आढावा घेतला.आपल्या यशामध्ये इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगीतले.अतिशय खडतर अशी वाटचाल होती.गेल्या 37 वर्षाच्या कारकीर्दीत आलेले अनेक अनुभव त्यांनी कथन केले. त्यानंतर संस्थेचे सचिव श्री.वीरसिंह रणसिंग यांनी प्रा.डाॅ.काझी यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. आज काॅलेजला जेवढी वर्षे झाली तेवढी त्यांची सेवा झाल्याचे व या काळात घडलेल्या सर्व घडामोडींचे ते साक्षीदार असल्याचे नमुद केले.सर्वच पदाधिका-यांनी प्रा.डाॅ.काझी यांना त्यांच्या भावी आयुष्याबध्दल शुभेच्छा दिल्या. डॉ.तेजश्री हुंबे यांनी आभार मानले. ‘ कानडा राजा पंढरीचा’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. हे गीत सहयोगी प्राध्यापक गुळीग आणि समाना काझी यांनी सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय केसकर यांनी केले. आपल्या सुत्रसंचलनामध्ये प्रा.डाॅ.काझी हे महाविद्यातील अनेक पहिले असल्याचे आवर्जून सांगीतले.ते या महाविद्यालयाचे सुरूवातीपासूनचे शिक्षक होते. ते या महाविद्यालयाचे पहिले स्नेहसंमेलन कार्याध्यक्ष,सलग दोन वर्षे स्नेहसंमेलन कार्याध्यक्षपद भूषविणारे पहिले,संशोधन पेपर सादर करणारे पहिले,संशोधन पेपर प्रकाशित झालेले पहिले,पहिले पेपर सेटर.पेपर सेटर समितीचे महाविद्यालयातील पहिले चेअरमन,महाविद्यालयातील पहिले प्राध्यापक,विद्यापीठाच्या अनेक समित्यावर त्यांनी काम केले होते. अशा अनेक ‘पहिल्याचा’ मान त्यांना मिळाला असल्याचे त्यांनी नमुद केले.कार्यक्रमावेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.काझी सरांचा हा सेवा प्रवास नवीन पिढीला निश्चितच प्रेरणादायी असा ठरणार आहे.
