Thu. Apr 23rd, 2026

मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू मतदार नोंदणी, नोंदींची पडताळणी करण्याची संधी

Spread the love

मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू
मतदार नोंदणी, नोंदींची पडताळणी करण्याची संधी

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

पुणे दि. 1: भारत निवडणूक आयोगाने घोषित केल्याप्रमाणे 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यानुसार 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत, अशी माहिती पर्वती विधानसभा मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी यांनी दिली आहे.

या कार्यक्रमांतर्गत एकत्रीकृत प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. दि. 30 नोव्हेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. शनिवार 13 नोव्हेंबर, रविवार 14 नोव्हेंबर, शनिवार 27 नोव्हेंबर आणि रविवार 28 नोव्हेंबर 2021 या दिवशी सर्व मतदान केंद्रावर मतदार नोंदणीसाठीचे अर्ज, दावे व हरकती स्वीकारणे आदींसाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.

या कार्यक्रमादरम्यान नवीन मतदार नोंदणी, मयत, स्थलांतरित मतदार तसेच दुबार नावे वगळणे, नावात, पत्ता, इतर तपशीलात दुरूस्ती, मतदार नोंदीचे स्थानांतरण आदी अर्जांवर कार्यवाही करण्यात येणार आहे. मोहिमेदरम्यान यासाठी आवश्यक नमुना अर्ज भरुन आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे (बूथ लेव्हल ऑफीसर- बीएलओ) द्यावेत. तसेच या सर्व सुविधा ऑनलाईनरित्या https://www.nvsp.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत.

मतदार याद्या अधिक अचूक आणि दोषरहीत करण्याच्यादृष्टीने सर्व राजकीय पक्ष आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही 212-पर्वती मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी श्रीमती सुरेखा माने यांनी केले आहे.

Related Post

error: Content is protected !!