Thu. Apr 16th, 2026

राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द ! निर्णयावरोधात उच्च न्यायालयात याचिका

Spread the love

राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द ! निर्णयावरोधात उच्च न्यायालयात याचिका

संपादकीय

राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या व शिक्षण विभागाच्या “राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका प्रा. धनजय कुलकर्णी यांनी ॲड.उदय वारुंजीकर यांच्या द्वारे मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

या याचिकेवर न्या.के.के. तातेड व न्या.अभय अहुजा यांच्या खंपीठापुढे याबाबत सुनावणी होणार आहे.

या याचिकेत प्रा.धनंजय कुलकर्णी यांनी जर राज्यसरकार, इयत्ता अकरावी प्रवेशासाठी दहावी च्या परीक्षेला राज्यभरातील माध्यमिक शाळांमधील १६लाख विद्यार्थ्यांची सीई टी ची परीक्षा घेणार असेल,तर दहावी ची परीक्षा का घेऊ शकत नाही,राज्य सरकार चा शिक्षण विभाग हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीच्या १४लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेणार असेल तर दहावीच्या १६ लाख विद्यार्थ्यांची परीक्षा का घेऊ शकत नाही,आणि अशा परीक्षा घेणे का शक्य नाही,त्या परीक्षा घेण्याबाबत न्यायालयाने हस्तक्षेप करावा,या प्रकारची विनंती या याचिकेत केली आहे.
प्रा.धनंजय कुलकर्णी यांनी गेल्या शैक्षणिक वर्षात राज्य सरकार च्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता,या शासनाच्या निर्णय
विरोधात सर्वप्रथम उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती,या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने परीक्षे शिवाय पदवी देणे योग्य नसल्याचे सांगत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा आदेश देण्यात आल्याने राज्यसरकरने विद्यापीठ मार्फत परीक्षा घेतल्या,त्यामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय बाबत उच्च न्यायालय काय निर्णय घेणार व राज्य सरकार न्यायालयात काय बाजू मांडणार याकडे पालक,विद्यार्थी व शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे

Related Post

error: Content is protected !!