Fri. Apr 24th, 2026

इंदापूर येथील ह्रदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया तसेच श्रवण क्षमता तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद*

Spread the love

इंदापूर येथील ह्रदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया तसेच श्रवण क्षमता तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद*

राज्यमंत्री मा.ना.श्री.दत्तात्रय (मामा) भरणे यांचे विशेष प्रयत्नातून इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठान आयोजित,तसेच श्रीमती कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल,मुंबई यांच्या सहकार्याने आज 0 ते 18 वयोगटातील बालकांसाठी *”भव्य मोफत हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया तसेच श्रवण क्षमता तपासणी शिबीराचे”* आयोजन करण्यात आले होते.या शिबीराचे उद्घाटन *राज्यमंत्री मा.ना.श्री. दत्तात्रय (मामा) भरणे सो* यांचे *शुभहस्ते* करण्यात आले.
या निमित्ताने माननीय भरणे मामांच्या प्रयत्नातून इंदापूर तालुक्यातील भिगवण व बावडा रूग्णालयासाठी मंजूर झालेल्या ३ रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा पार पडला.यावेळी बोलताना माननीय भरणे मामांनी सांगितले की,अलीकडच्या काळामध्ये दवाखान्यांचा खर्च गोरगरिबांच्या आवाक्याबाहेर गेल्यामुळे त्यांना मोठ्या आजारांवर उपचार करणे शक्य होत नाही,परिणामी केवळ पैशाअभावी त्यांच्या आरोग्यास धोका होवु नये या भावनेतून कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे माध्यमातून आज हा स्तुत्य उपक्रम पार पडत आहे.पुढे बोलताना माननीय भरणे मामा म्हणाले की,आयुष्यात गोर-गरिब माणसांसाठी केलेले काम ते आयुष्यभर कधीही विसरत नाहीत.आणि अशा कामातूनच ख-या अर्थाने पुण्य मिळत असते, त्यामुळे येथून पुढच्या काळामध्ये सुध्दा सर्वसामान्य जनतेसाठी वेगवेगळ्या शिबीरांचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठान च्या वतीने कोराना काळामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना कोराना योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्याबरोबर शेकडो मान्यवरांनी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने रक्तदान केले.या कार्यक्रमास पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांतराव पाटील,मार्केट कमिटीचे संचालक ॲड.मधुकर (मामा) भरणे,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील,तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे-पाटील,सहकार महर्षी कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन तानाजीराव हांगे,कार्याध्यक्ष अतुल झगडे,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खजिनदार सचिन बोगावत,पंचायत समितीचे गटनेते बाळासाहेब काळे,पंचायत समिती सदस्य सतिश पांढरे,ॲड.भारत जगताप,राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश शिंदे सर,अनिल राऊत,कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिकेत (नाना)भरणे,संचालक अक्षय (भैय्या) भरणे,राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब व्यवहारे,वसंत मारकड,वरिष्ठ उपाध्यक्ष शिवाजीराव पानसरे सर,इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे-पवार, नानासाहेब नरूटे,नवनाथ रूपनवर,युवक कार्याध्यक्ष सचिन खामगळ,युवती तालुकाध्यक्षा अश्विनी कुर्डे,विद्यार्थी तालुकाध्यक्ष सागर व्यवहारे,पदवीधर सेल तालुकाध्यक्ष रमेश पाटील,सेवादलाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय मोरे,डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डॉ.अमोल खानावरे, भटक्या विमुक्त जाती जमाती सेलचे तालुकाध्यक्ष आण्णासाहेब धोत्रे,सोशल मिडिया चे तालुकाध्यक्ष हामा पाटील, अनंतराव पवार प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रणजित घोगरे,उपाध्यक्ष तात्यासाहेब वडापूरे,धनाजी थोरात,संजय देवकर,सरचिटणीस धनंजय तांबिले,सुभाष डरंगे-पवार, नगरसेवक अनिकेत वाघ,अमर गाडे,स्वप्निल राऊत,पोपट शिंदे,अशोक मखरे सर,माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस,दादासाहेब सोनवणे,राजेश शिंदे,युवकचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Related Post

error: Content is protected !!