Fri. Apr 24th, 2026

जागतिक महामारीच्या काळात वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्या शाखे समोरील आव्हाने आणि संधी या विषयावर राज्यस्तरीय वेबिनार चे आयोजन

Spread the love

जागतिक महामारीच्या काळात वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्या शाखे समोरील आव्हाने आणि संधी या विषयावर राज्यस्तरीय वेबिनार चे आयोजन

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

कळंब (वालचंदनगर) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित इंदापूर तालुका ग्राम विकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय येथे वाणिज्य विभाग, अंतर्गत गुणवत्ता सुधार समिती व द युनिक ॲकॅडमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “ कोरोना महामारीच्या काळात वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखे समोरील आव्हाने आणि संधी ”या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक प्रा. डॉ. अरुण कांबळे यांनी व उद्घाटन मा.श्री. वीरसिंह रणसिंग (भैय्या) विश्वस्त, इंदापूर तालुका ग्राम विकास प्रतिष्ठान यांनी केले. पहिल्या सत्रा मध्ये युनिक अकॅडमी पुणे येथील प्रा. कैलास भालेकर सर यांनी सांगितले की ग्रामीण भागातील विद्यार्थी हा योग्य मार्गाने अभ्यास केला तर स्पर्धा परीक्षा सहज उत्तीर्ण होऊ शकतो त्यासाठी त्याने सकारात्मक दृष्टिकोन, संयम, स्वतःला सिद्ध करण्याची संधी ओळखली पाहिजे. दुसऱ्या सत्रामध्ये प्रा.डॉ. अरुण गायकवाड प्राचार्य, संगमनेर महाविद्यालय यांनी सांगितले की कोरोनाने जशी आव्हाने निर्माण केली तशी संधी देखील निर्माण केली आहे तंत्रज्ञानाच्या साह्याने शिक्षण क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल झाले ते विद्यार्थी, प्राध्यापक, पालक यांनी अनुभवले आणि आत्मसात केले .येणारा काळ जर आपल्याला उज्वल करायचा असेल तर विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे नवीन मार्ग अवलंबले पाहिजेत. तिसऱ्या सत्रासाठी व्याख्याते म्हणून वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,सहयोगी अधिष्ठाता प्रा.डॉ. यशोधन मिठारे होते .त्यांनी सांगितले की, सध्या जागतिक पातळीवर औद्योगिक क्रांतीचा चौथा टप्पा सुरू आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला परंपरागत गोष्टींपेक्षा भविष्यचा वेध घेऊन काळाच्या पुढे गेल्यास आपणाला प्रचंड संधी आहे परंपरागत नोकरी व्यवसाय यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होतील .त्यातून अनेक संधी निर्माण होतील. त्याचा शोध घेऊन विद्यार्थी व प्रत्येक व्यक्ती आपले जीवन सुखी करू शकतो. माहितीचे पृथक्करण, इंटरनेटचे जग यांनी प्रत्येक क्षेत्रात विकास होईल यासाठी भविष्याचा अचूक अंदाज घ्या . दुसऱ्यांचा विचार न करता स्वतःकडे लक्ष ठेवून आपला विकास करता येईल असे मत त्यांनी मांडले .अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. अंकुशराव आहेर म्हणाले की, येणारा काळ हा संधींचा असेल त्यासाठी आपण आवश्यक पात्रता आत्मसात करावी .सदर राज्यस्तरीय वेबिनार यशस्वी करण्यासाठी इंदापूर तालुका ग्राम विकास प्रतिष्ठानचे विश्वस्त मा. श्री. वीरसिंह रणसिंग, सचिव – मा. श्री. प्रकाश कदम, खजिनदार-मा. हनुमंतराव रणसिंग, विश्वस्त-शिवाजीराव रणवरे, महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. अंकुश राव आहेर, अंतर्गत गुणवत्ता सुधार समिती समन्वयक प्रा. प्रशांत शिंदे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. अरुण कांबळे, प्रा. डॉ विलास बुवा, प्रा प्रशांत शिंदे ,ग्रंथपाल विनायक शिंदे, संगणक सहाय्यक प्राध्यापक गणेश शिंदे , चंद्रकांत खराटे सर वसंत घुले सर ,वाणिज्य विभाग व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक ,कर्मचारी यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमासाठी संपूर्ण राज्यभरातून अनेक महाविद्यालयातील सुमारे २५० प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. योगेश खरात यांनी केले तर आभार प्रा. अभिजीत शिंगाडे यांनी मानले.

Related Post

error: Content is protected !!