Thu. Apr 23rd, 2026

ग्रंथपाल हा साहीत्य व वाचक यातील दुवा – ॲड. संभाजीराव पगारे (उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ)

Spread the love

ग्रंथपाल हा साहीत्य व वाचक यातील दुवा – ॲड. संभाजीराव पगारे (उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ)

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

ग्रंथपाल हा साहित्य व वाचक यातील महत्त्वाचा दुवा असून वाचन संस्कृती टिकविण्यासाठी रुजविण्यासाठी महत्त्वाचे योगदान त्यांच्या माध्यमातून होत आहे असे प्रतिपादन धुळे जिल्हा ग्रंथपालन वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी राज्य ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष ॲड. संभाजीराव पगारे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनिल सोनवणे होते. प्रमुख अतिथी म्हणून नाशिक विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. दत्ता परदेशी, धुळे जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह राहुलकुमार महिरे, अविनाश भदाणे (नाशिक विभाग संचालक) प्रा. प.प.पाटील, ज्ञानेश्वर माळी (सहकार्यवाह)रोहिदास हाके, नरेंद्र देवरे प्रा.एच.ए.पाटील (धुळे तालुकाध्यक्ष) ही.रा.चौधरी ,श्रावण पाटील (शिरपूर तालुकाध्यक्ष)आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ग्रंथपालन वर्गाची पुस्तके मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी धुळे जिल्हा ग्रंथालय संघ संचालक महेंद्र जाधव, प्रमोद महाजन, राजकिरण राजपूत,भटू माळी आदींनी योगदान दिले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक राहुलकुमार महिरे यांनी केले आभार प्रा.एच.ए.पाटील यांनी मानले. कार्यक्रम यावेळी ग्रंथालय संघाचे कार्यकर्ते विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Post

error: Content is protected !!