Thu. Apr 23rd, 2026

मराठा आरक्षणावरून माथी भडकवू नका – राज ठाकरे

Spread the love

मराठा आरक्षणावरून माथी भडकवू नका – राज ठाकरे

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीपातींमधील द्वेष वाढल्याच्या वक्तव्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुनरुच्चार केला.
मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसेल तर तसे स्पष्ट सांगायला हवे.
माथी भडकवण्याचे काम करू नये,
असे स्पष्ट मतही राज ठाकरे यांनी मांडले.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीपातींमधील द्वेष वाढल्याचे वक्तव्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार वाचण्याचा सल्ला दिला होता.
या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी पवार यांना प्रत्युत्तर दिले.
ठाकरे म्हणाले,
की राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीपातींमधील द्वेष वाढला हे सगळ्यांना माहीत आहे.
सर्व राजकीय पक्षांनाही माहिती आहे.
मी फक्त बोललो.
राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरे पुन्हा वाचावेत,
याचा अर्थ मला कळला नाही.
माझ्या आजोबांचे अनेक संदर्भ त्या त्या काळातले होते.
आपल्याला पाहिजे तेवढेच प्रबोधनकार ठाकरेंचे विचार घ्यायचे, बाकीचे घ्यायचे नाहीत असे करता येणार नाही.
माझ्या आजोबांची पुस्तके  मी वाचली आहेत,
यशवंतराव चव्हाण यांचे विचारही मी वाचले आहेत.
मी जे बोललो, त्याचा माझ्या आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध होता हे मला पवार साहेबांनी समजावून सांगावे.
नरेंद्र मोदी विकासाच्या मुद्यावर पंतप्रधान झाले.
म्हणजे विकासाच्या मुद्यावर लोक मतदान करतात.
बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे मी ते ब्राह्मण म्हणून नाही,
तर इतिहास संशोधक आहेत म्हणून जातो,
असेही ठाकरे यांनी नमूद केले.

Related Post

error: Content is protected !!