Wed. Apr 29th, 2026

खेड,चिपळूणमधील अतिवृष्टी;👉 मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आतापर्यंत २३ लाखांचे वाटप.

Spread the love

खेड,चिपळूणमधील अतिवृष्टी;👉 मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आतापर्यंत २३ लाखांचे वाटप.

संपादकीय:- रामवर्मा आसबे

*रत्नागिरी -खेड, चिपळूण अतिवृष्टीतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १ लाखांची मदत देण्याचे काम प्रशासनाने सुरु केले आहे. आजपर्यंत यातील २३ लाखांचे वाटप पूर्ण झाले आहे. नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्यांच्या वारसांना १ कोटी ८ लाख रुपयांचे तर जखमीना १ लाख ५३ हजार रुपयांची मदत देण्यात आली. आपत्तीत बाधित गावामध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे मोफत गहू आणि तांदुळ पुरवठा करण्यात येत असून आजपर्यंत २०७ गावातील ६४४६ कुटुंबांना ६४४.६० क्विंटल गहू आणि ६४४.६० क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे.*

*👉बाधितांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने मोफत शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात येत आहे. यात ऑनलाईन पध्दतीने आजर्यंत ५०३८६ व ऑफलाईन पध्दतीने ३१२१ अशा एकूण ५३५०७ शिवभोजन थाळींचे वाटप झालेले आहे. तसेच ६४ बाधित गावांतील २५६० कुटुंबांना १२ हजार ८०० लिटर केरोसीन वाटप करण्यात आले आहे.*

Related Post

error: Content is protected !!