Wed. Apr 29th, 2026

मराठा आरक्षण : “बेमुदत उपोषण करण्याची माझी तयारी आहे” – छत्रपती संभाजीराजे

Spread the love

मराठा आरक्षण :
“बेमुदत उपोषण करण्याची माझी तयारी आहे” – छत्रपती संभाजीराजे

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

मराठा आरक्षणावरुन आंदोलन पुकारणारे भा.ज.पा. खासदार संभाजीराजेंनी पुन्हा एकदा लढा सुरु करण्याचा इशारा दिला आहे.
आता पुढच मूक आंदोलन नांदेड येथे होणार असल्याचं संभाजीराजेंनी पुण्यामधील मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीमध्ये म्हटलं आहे.
तसेच मी सुद्धा आता तेच तेच बोलून थकलोय अशा शब्दात त्यांनी आपली या मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन होत असलेल्या विलंबाबद्दलची नाराजी व्यक्त केलीय.
मात्र त्याचवेळेस त्यांनी मराठा आरक्षणासाठी आता थेट मुंबईतील आझार मैदानावर लाक्षणिक किंवा बेमुदत उपोषण करण्याची घोषणा संभाजीराजेंनी केलीय.
“माझी एकट्याची आझाद मैदानावर लाक्षणिक किंवा बेमुदत उपोषणास करण्याची माझी तयारी आहे.
तुम्हीच ठरवा आणि सांगा,” असं संभाजीराजेंनी या बैठकीमध्ये सहभागी झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना आणि कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.
२० ऑगस्ट रोजी नांदेड येथे मूक आंदोलन होणार होणार असल्याची घोषणा या कार्यक्रमामध्ये मराठा क्रांती मूक मोर्चा समन्वयकांनी केलीय.
१५ जुलै रोजीच संभाजीराजेंनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपसमितीच्या सदस्य मंत्र्यांना पत्र लिहिलं असून आपली नाराजी जाहीर केली होती.
“मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी केलेल्या मूक आंदोलनाची दखल घेऊन राज्य शासनाने दि. १७ जून रोजी बैठक घेतली.
या बैठकीत समाजाच्या मागण्या शासनस्तरावर मान्य करण्यात आल्या.
त्यांच्या पूर्ततेसाठी प्रशासनाने कालावधी मागितला होता.
मात्र एक महिना पूर्ण होऊनदेखील प्रशासनाने कार्यवाही केलेली नाही,
” असं यावेळी संभाजीराजेंनी म्हटलं होतं.

Related Post

error: Content is protected !!