Mon. Apr 27th, 2026

शेतकरी भावांनो खचुन जाऊ नका. तुमचा भाऊ म्हणून आपल्या साठी लढायला तयार आहे!प्रशांत डिक्कर.*

Spread the love

शेतकरी भावांनो खचुन जाऊ नका. तुमचा भाऊ म्हणून आपल्या साठी लढायला तयार आहे!प्रशांत डिक्कर.*

*सरकारने कंपनीचा हिस्सा विमा हप्ता दिल्यास आठ दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विमा रक्कम जमा होणार.विजय मोरे राज्य प्रतिनिधी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी मुंबई.*

मतदार संघात नेत्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी पिक विम्याच्या नावावर राजकिय गोरखधंदा सुरू.

संग्रामपूर : खरिप २०२० चा पिक विम्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांना हक्काचा पिक विमा मिळण्यासाठी गेल्या १० महिन्यापासून तालुका स्तरा पासून तर उपविभागीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सतत आंदोलने केले. आंदोलनामधे ३७० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांच्या अंगावर पोलिस केसेस दाखल झाल्या आहेत. परंतु काही लोकप्रतिनिधींनी विमा कंपनी सोबत हातमिळवणी केली असल्याने पिक विमा मंजूरसाठी कंपनी कडून दिरंगाई होत असल्याने मुंबईमधे पावसाळी अधिवेशनात. राजभवना समोर आंदोलन केले. पंरतु पिक विम्याचा विषय सभागृहात विधानसभेच्या पटलवार येऊ न देता कंपनी कडून कमीशन घेऊन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याच महापाप या लोकप्रतिनिधींनी केले आहे. आणि म्हणून आम्ही परीणामाची चिंता न करता शेकडो शेतकऱ्यांनासह पुणे येथे २६ जुलै ला कृषी आयुक्तालय कार्यालयावर आंदोलन सुरू केले. या आंदोलनामध्ये मा.खा.राजु शेट्टी साहेब यांनी विशेष लक्ष घालून पिक विमा प्रश्नावर तोडगा निघाला नाही तर राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याचा ईशारा यावेळी देण्यात आला. त्यामुळे मा. कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांचे सुचनेनुसार कृषी आयुक्त यांनी तत्काळ बैठक घेतली. आणि बैठकीत प्रशांत डिक्कर यांनी विरोध करणाऱ्यांच्या नाकावर टिच्चून संग्रामपुर जळगाव व शेगाव तालुक्यातील पिक विमा मंजूर करून घेतला. पण पक्षाची लाचारी करणारे मतदार संघातील काही विघ्नसंतोषी भक्तांनी नेत्याच अस्तित्व टिकवून राहण्यासाठी तालुक्यात खोटी अफवा पसरवून आंदोलनाचे पवित्रे घेत आहेत. त्यांनी आंदोलन करायच जरूर करा. पंरतु सरकारने कंपनीचा हिस्सा विमा हप्ता रोखुन ठेवला आहे. त्या सरकार विरोधात आंदोलन करा.जेणेकरूण तुमच्या आंदोलनाने सरकारला जाग येईल. शेतकऱ्यांच्या वतिने आमची येवढीच विंनती आहे. शेतकऱ्यांमध्ये खोट्या अफवा पसरवून संभ्रम निर्माण करु नका. कारण दि.३० जुलै रोजी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी गोरेगाव मुंबई ऑफिसमध्ये जाऊन. संग्रामपूर जळगाव व शेगाव तालुक्यातील मंजुर करण्यात आलेली पिक विमा रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यासाठी कंपनीचे राज्य प्रतिनिधी यांची भेट घेऊन कंपनीला पत्र दिले. परंतु सरकारने कंपनीचा हिस्सा विमा हप्ता कंपनिला तत्काळ दिल्यास शेतकऱ्यांचा पिक विमा रक्कम लवकरच बॅंक खात्यावर जमा होणार आहे. सरकारने कंपनीचा हिस्सा विमा हप्ता रोखुन ठेवल्याने रिलायन्स कंपनी कडून राज्यातील १० जिल्ह्यातील विमा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यासाठी विलंब होत असल्याचे कंपनी कडून सांगण्यात आले आहे.

Related Post

error: Content is protected !!