Thu. Apr 30th, 2026

ग्यानबा तुकाराम’ च्या गजरात तुकोबारायांच्या पादुका माऊलींच्या भेटीसाठी रवाना……

Spread the love

‘ग्यानबा तुकाराम’ च्या गजरात तुकोबारायांच्या पादुका माऊलींच्या भेटीसाठी रवाना……

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

संत तुकाराम महाराज यांच्या पादुका एस.टी.ने पंढरपूर च्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत.
१ जुलै रोजी तुकोबांचा पालखी सोहळा मुख्य मंदिरात पार पडला होता.
दरम्यान, करोनाचं संकट असल्याने यावर्षी देखील पालखी मुख्य मंदिरात विसावल्या होत्या.
तर, आज एस.टी.मधून ग्यानबा तुकाराम म्हणत टाळ मृदंगाच्या गजरात पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत.
१ जुलै पासून देहूच्या मुख्य मंदिरात गोल रिंगण, मेंढ्यांच रिंगण, अश्वाच रिंगण असे सोहळे पार पडले आहेत.
हे सर्व सोहळे दरवर्षी पंढरपूरच्या दिशेने पायी वारी जाते तेव्हा पार पडत असतात.
परंतु, यावर्षी देखील करोनाचं संकट असल्याने मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला आहे.
आज सकाळी मुख्य मंदिरात प्रदक्षिणा घातल्यानंतर पालखी इनामदार वाड्यात टाळ मृदंगाच्या गजरात पोहचली.
तिथे पादुकांची आरती करून झाल्यानंतर एस.टी.मध्ये पादुका विसावल्या. तुकोबांचा जयघोष करत ग्यानबा तुकारामाने परिसर दुमदुमून गेला होता.
एस.टी.मधून पादुका पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत.

Related Post

error: Content is protected !!