म.न.से.सोबत युती करणार का?;
देवेंद्र फडणवीसांनी केलं सूचक विधान
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
महाराष्ट्रामधील आगामी काळामध्ये येणारी सर्वात मोठी निवडणूक म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असून या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती करणार हा प्रश्न वारंवार समोर येत असतो.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीहून नागपूरला आले आहेत.
नागपूर विमानतळावर येताच माध्यमांनी त्यांना घेराव घातला.
यावेळी म.न.से.सोबत मुंबई महापालिकेत युती होणार का?
असा सवाल पत्रकारांनी विचारला.
या प्रश्नावर राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
असा सवाल करण्यात आल्यावर योग्यवेळी योग्य निर्णय होईल,
असं सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
त्यामुळे भा.ज.पा. आणि म.न.से. एकत्र येणार का?
या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.
म.न.से.ने परप्रांतीयांबाबतचा मुद्दा सोडला तर त्यांच्याशी युती होऊ शकते,
असे भा.ज.पा.चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.
याबाबत देवेंद्र फडणवीसांना विचारले असता,
म.न.से.सोबत युती करण्याचा निर्णय योग्यवेळी होईल.
अजून त्याला वेळ आहे,
असं ते म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य तुम्ही पूर्णपणे समजून घेत नाही.
अर्धवट समजून घेता,
असंही त्यांनी म्हटलं.
