Tue. Apr 28th, 2026

रोहित पवार एकच दिवस येतात आणि रोज कार्यक्रम घेतल्याचे दाखवतात – माजी मंत्री राम शिंदेचा आरोप

Spread the love

रोहित पवार एकच दिवस येतात आणि रोज कार्यक्रम घेतल्याचे दाखवतात – माजी मंत्री राम शिंदेचा आरोप

सचिन तरंगे ( शिव-कल्याण न्यूज नेटवर्क )

‘एक दिवस येतात, 10-15 फोटो काढतात, नंतर रोज कार्यक्रम घेतल्याचे फोटो टाकतात’, अशी गंभीर टीकास्त्र माजी मंत्री राम शिंदें यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर सोडले.

“रोहित पवार एक दिवस मतदारसंघात येतात आणि 10-15 फोटो काढून जातात. नंतर सोशल मीडियावर पोस्ट करुन रोज कार्यक्रम घेत असल्याचं दाखवतात,” असा गंभीर आरोप माजी मंत्री राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर केलाय.

कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य सुनीता खेडकर यांच्या निधीतून विविध कामांचे उद्घाटन शुभारंभ माजी मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं.

त्यावेळी राम शिंदे यांनी खेडकर यांच्या कामाचं कौतूक करताना रोहित पवारांवर टीकास्त्र सोडले.

राम शिंदे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना मी मतदारसंघातील कामांबद्दल अनेक प्रश्न विचारले. मात्र, आमदार रोहित पवार यांच्याकडून त्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. माझ्या प्रश्नांना उत्तरे द्यायला ते घाबरतात काय? आमदार रोहित पवार एक दिवस येतात, दहा-पंधरा फोटो काढून जातात. नंतर सोशल मीडियात पोस्ट करून रोज कार्यक्रम घेत असल्याचे दाखवितात. हा त्यांचा राजकीय स्टंट आहे’.

जलयुक्त शिवार कामाचीचौकशी करा –

‘जलयुक्त शिवार कामाची चौकशी कर्जत तालुक्यातच जास्त सुरू आहे. पण कितीही चौकशी करा, यातून काहीच निष्पन्न होणार नाही,’ असंही त्यांनी नमूद केलं.

Related Post

error: Content is protected !!