वालचंदनगरच्या वर्धमान विद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी केला राधा खुडे हिचा ऑनलाइन सत्कार
श्रीकृष्ण सातव ( फलटण तालुका प्रतिनिधी )
‘सूर नवा ध्यास नवा’या टीव्हीवरील कार्यक्रमात तिसऱ्या क्रमांकाने विजयी झालेली वालचंदनगर निवासी कुमारी राधा दत्ता खुडे हीचा सत्कार करताना वालचंदनगरचे वर्धमान विद्यालय चे आजी माजी विध्यार्थी , शिक्षक यांनी व पुणे येथील ह्याच विद्यालयातून शिक्षण घेतलेले माजी विध्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आजोजित केला ,कोरोना चा काळ असल्याने हा सर्व कार्यक्रम झूमवर मीटिंग घेऊन सर्वांपर्यंत पोहोचविण्यात आला , विशेष म्हणजे ह्या झूम मीटिंग मध्ये संपूर्ण भारतातील व जगातून म्हणजे कोरियातून देखील माझी विद्यार्ध्यानी सहभाग घेतला , ह्या प्रसंगी राजुशेठ उर्फ देवेंद्र पालिवाल , मंजुश्री नितीन कुलकर्णी मॅडम , अंबिके मॅडम , अंबिके सर , नितीन कुळकर्णी सर ह्यांनी समक्ष जाऊन राधा खुडे हिला सन्मान म्हणून ट्रॉफी व कॉर्डलेस माईक भेट दिला , त्याच प्रमाणे राधाच्या आई ला साडी चोळी व वडिलांना पॅन्ट शर्ट टोपी देवून यथोचित सत्कार केला , योगायोगाने कालच राधाचा वाढदिवस होता .
ह्या सर्व कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन पुण्यातून अल्पना देशपांडे अंबिके , प्रमोद ठकार , प्रकाश कुलकर्णी व मुकुंद दातार , सूर्यकांत बरसावडे यांनी केलं व सर्व इतर विध्यार्थ्यांनी सहकार्य केले.
