कळंब येथे चोरींचे प्रमाणात वाढ
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
कळंब ( ता. इंदापूर ) येथे चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. जाधव वस्ती, पवार वस्ती, खंडागळे वस्ती, ह्या परिसरातील विहिरीतील मोटर,शेळी, बोकड, केबल, मोबाईल सरासरी किंमत रू.एक लाखचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
चोर कोण आहेत याचा वालचंदनगर पोलीसांनी चौकशी व तपास करून चोरट्यांना योग्य शासन मिळावे व संबंधित शेतकरी यांना त्यांचा मुद्देमाल परत मिळवून द्यावा, अशी माफक अपेक्षा डॉ.किसन पवार व कानिफ खंडागळे यांनी व्यक्त केली.
