•ओबीसी,मराठा आरक्षणाचा आग्रह धरल्यानेच भाजपा आमदारांचे निलंबन•
•लोकशाहीच्या हत्येविरोधात भाजपाचे आंदोलन
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
इंदापूर- ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि मराठा आरक्षणाबाबत विधानसभेत सरकारचा नाकर्तेपणा दाखवून दिल्यामुळे सरकारने खोटे आरोप लावून भारतीय जनता पार्टीच्या १२ आमदारांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ बुधवारी इंदापूर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात भाजपा नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.यावेळी प्रास्ताविक गजानन वाकसे यांनी केले तर तालूका अध्यक्ष शरद जामदार, जेष्ठ नेते मारूती वणवे यांनी मणोगत व्यक्त केले. केवळ दुष्ट हेतूने केलेली १२ आमदारांची निलंबनाची कारवाई तात्काळ मागे घेऊन आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपच्या भूमिकेस तोंड देण्याची हिंमत सरकारने दाखवावी अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली.राज्यातील वसुली सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी आरक्षण गमावले असून हे आरक्षण पुन्हा मिळेपर्यंत भारतीय जनता पार्टी राज्यात संघर्ष करतच राहील असा इशारा याप्रसंगी बोलताना श्री. भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी दिला.ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपच्या आक्रमकपणाला तोंड देण्याची हिंमत महावसुली सरकारमध्ये नसल्यामुळेच दडपशाही करून सभागृहात ओबीसी आरक्षणाचा आवाज दाबण्याकरिता सरकारने १२ आमदारांचे केलेले निलंबन म्हणजे लोकशाहीचा खून आहे,असे ते म्हणाले.ठाकरे सरकारला ओबीसी आरक्षण देण्याची इच्छाच नाही,तर केवळ वेळकाढूपणा करून ओबीसी समाजाची फसवणूक करावयाची आहे.त्यामुळेच,केंद्राकडे इम्पिरिकल डाटा मागण्याचा कांगावा करून विधानसभेतही फसवा ठराव करण्याचा सरकारचा डाव असून तो हाणून पाडण्यासाठी भाजपने वैधानिक मार्गाने सभागृहात आवाज उठवू नये यासाठीच ही लोकशाहीविरोधी कारवाई करण्यात आली,असा आरोपही पुणे जिल्हा व सोलापूर जिल्हा प्रभारी गजानन वाकसे त्यांनी केला.ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आवश्यक माहीती तयार करावी लागेल व केवळ मागासवर्गीय आयोगाची नेमणूक करूनच अशी माहिती तयार करता येणार आहे,हे स्पष्ट असूनही यासंदर्भात केंद्र सरकारकडे ठराव पाठवून ठाकरे सरकार केवळ टोलवाटोलवी करत आहे असे मत मारूती वणवे यांनी मांडले.तसेच ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे गमावलेले आरक्षण पुन्हा मिळवून देईपर्यंत भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता संघर्ष करेल,असा इशाराही यावेळी दिला.
यावेळी तालुकाध्यक्ष शरद जामदार, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस भ.वि.आ गजानन वाकसे, इंदापूर शहर अध्यक्ष शकिल सय्यद,मारूती (आण्णा) वणवे,अनुसूचित जमाती मोर्चा संतोष कांबळे,महेंद्र (दादा) रेडके,दिनेश मारणे,तेजस देवकाते,सुयोग सावंत, राजकुमार जठार,हाणूमंत निंबाळकर, सचिन सावंत,संतोष कदम,मल्हारी गायकवाड तसेच अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकशाही पद्धतीने आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे ओबीसी समाजातील आमदारांना निलंबित करून सरकारने काय साधला असाही सवाल भाजपातील यावेळी केला सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
