Thu. Apr 30th, 2026

आर.टी.ओ.’तील खेपा वाचणार, लायसन्सची दुय्यम प्रत, नूतनीकरण सेवा पूर्णपणे ऑनलाइन

Spread the love

‘आर.टी.ओ.’तील खेपा वाचणार,
लायसन्सची दुय्यम प्रत,
नूतनीकरण सेवा पूर्णपणे ऑनलाइन

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

मुंबई : डिजिटल स्वाक्षरी, शिकाऊ लायसन्सची (अनुज्ञप्ती) घरबसल्या परीक्षा सेवा सुरू केल्यानंतर लवकरच लायसन्सची दुय्यम प्रत (डुप्लीकेट) आणि लायसन्स नूतनीकरण सेवा पूर्णपणे ऑनलाइन करण्यात येणार आहे.
या दोन सेवांच्या कागदपत्रे पडताळणी आणि अर्जासाठी सध्या आर.टी.ओ.त जावे लागते.
हा खटाटोप वाचवण्यासाठी आधार कार्ड लिंक करून त्याची पडताळणीही ऑनलाइनच होणार आहे.
या सेवेवर परिवहन विभाग आणि नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटरकडून (एन.आय.सी.)काम सुरू आहे.
पक्के  लायसन्स हरविल्यास त्याची दुय्यम प्रत प्राप्त करण्यासाठी पोलिसांचा अहवाल किंवा लायसन्स खराब झाल्यास आधीच्या लायसन्सची प्रत व अन्य कागदपत्रे लागतात.
जर पत्ता बदलायचा असल्यास तसा अर्जही भरावा लागतो.
दुय्यम प्रत मिळवण्यासाठीची सेवा ऑनलाइन आहे.
ही सर्व कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावी लागतात.
परंतु ती अपलोड केल्यानंतर त्याची पुन्हा प्रिंट काढून त्याच्या पडताळणीसाठी आर.टी.ओ.त यावे लागते.
त्यानंतर लायसन्सची दुय्यम प्रत घरपोच येते.
लायसन्स नूतनीकरणासाठीही अशीच सेवा आहे.
त्यामुळे ऑनलाइन सेवा
केल्यानंतरही त्याच्या पडताळणीसाठी वाहनचालकाला आर.टी.ओ.च्या खेपा माराव्या लागतात.
त्यात बराच वेळ जातो. यातून वाहनचालकाची सुटका करण्यासाठी लायसन्सच्या दुय्यम प्रत सेवा आणि लायसन्स नूतनीकरणाची सेवा पूर्णपणे ऑनलाइनच करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे.
त्यासाठी एन.आय.सी.ची मदत घेतली जात आहे.
यात दोन्ही सेवांना सध्या आधार कार्ड लिंक करता येत नाही.
ऑनलाइन सेवेत आधार कार्ड लिंक करावे लागेल.
ती प्रक्रिया होताच ओ.टी.पी. मिळेल.
ओ.टी.पी. भरताच पुढील प्रक्रिया करावी लागेल.
आधार कार्डमुळे त्या चालकाची सर्व योग्य आणि खरी माहिती आर.टी.ओ.ला उपलब्ध होईल.

Related Post

error: Content is protected !!