अजित पवार यांनी सत्तेचा गैरवापर करून साखर कारखाना बळकावला
माजी मुख्यमंत्र्याच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचा आरोप

सचिन तरंगे ( शिव-कल्याण न्यूज नेटवर्क )
अजित पवार यांनी सत्तेचा गैरवापर करून जरंडेश्वर साखर कारखाना बळकविल्याचा घणाघात माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी केला.
“देवाच्या काठीला आवाज नसतो. शंभर अपराध भरले की फटका बसतोच,” अशी प्रतिक्रिया शालिनीताई पाटील यांनी ईडीच्या कारवाईवर दिली आहे.
जरंडेश्वर कारखान्यावर ईडीची कारवाईत
कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केली
यावर शालिनीताई पाटील यांनी विविध न्यायालयांमध्ये धाव घेतली. कोणत्याही परिस्थितीत कारखाना परत मिळवायचाच, असा चंग त्यांनी या वयातसुद्धा माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी बांधलाय असे स्पष्ट होते. कारखान्यातील कामगारांसह अन्य जवळच्या लोकांच्या नावावर विविध वित्तीय संस्थांकडून कर्जे उचलल्याने दरवर्षी कारखान्याची आर्थिक घडी विस्कळीत होत गेली,
जरंडेश्वर साखर कारखाना हा पूर्वी सहकारी कारखाना होता.
मात्र, महाराष्ट्र सहकारी बँकेचे कर्ज फेडू न शकल्याने त्या कारखान्याचा लिलाव झाला.
नंतर तो कारखाना खासगीत विकला. हा साखर कारखाना किरकोळ किंमतीत विकला गेला.
याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने 26 ऑगस्टला ‘ईडी’ने याप्रकरणी ‘पीएमएलएल’ कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक राजेंद्रकुमार घाडगे हे हा कारखाना चालवायचे. ही मालमत्ता सध्या गुरू कमोडिटी सर्व्हिस प्रा. लि. यांच्या नावावर आहे. ती जरंडेश्वर साखर मिल, स्पार्कलिंग सॉईल प्रा. लि. यांना लीजवर देण्यात आलेली. जरंडेश्वर साखर मिलमध्ये स्पार्कलिंग सॉईलचे बहुसंख्य शेअर्स आहेत.
स्पार्कलिंग सॉईल प्रा. लि. ही कंपनी उपमुख्यमंत्री अजित पवार व सुनेत्रा अजित पवार यांच्याशी संबंधित असल्याचे ‘ईडी’ने म्हंटलं आहे. त्याअनुषंगाने ‘ईडी’ने केलेली ही कारवाई मोठी व महत्वाची मानली जाते.
माजी आमदार शालिनीताई पाटील यांच्या म्हणण्यानुसार आमच्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर कर्जाचा हफ्ता केवळ ३ कोटींचा असताना त्यांनी विकला. वास्तविक आमच्या खात्यात ८ कोटी रुपये होते. मात्र, बँकेत सत्ता अजित पवारांची आणि खरेदी करणारेही अजित पवारच असल्यामुळे आम्ही काही करू शकलो नाही. त्यांनी सत्तेचा पुरेपूर गैरवापर केला. २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. थोडा उशीर झाला पण आम्हाला न्याय मिळाला. आम्ही चार जणांनी अर्ज केला होता.
उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक-
“आता जरंडेश्वर साखर कारखाना हा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या ताब्यात आहे. राजेंद्र कुमार घाडगे हे अजित पवार यांचे सख्खे मामा आहेत.
त्यामुळे अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या कारखान्यावर टाकलेली ही धाड आहे.
“हा कारखाना आधी शालिनीताई पाटील यांच्याकडे होता. शालिनीताई पाटील या वसंतदादा पाटील महाराष्ट्र विधानसभेच्या माजी सदस्य आहेत.
शालिनीताई पाटील आणि अजित पवार यांचं वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे अजित पवार हे राज्य सहकारी बँकेचे संचालक असताना त्यांनी हा कारखाना अवसायानात काढला. ज्याचा लिलाव केला आणि अत्यंत कमी किंमतीत या कारखान्याचा लिलाव केला.
“त्याच बँकेत असलेले पैसे कारखान्याच्या कर्जासाठी ट्रान्सफर करा असा आग्रह शालिनीताई पाटील यांनी धरला होता. मात्र तो आग्रह मोडीत काढत कारखान्याचा लिलाव करण्यात आला आणि तो कारखाना राजेंद्र कुमार घाडगे यांनी घेतला. मात्र या सगळ्या प्रकरणात प्रचंड आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप शालिनीताईंनी केला होता.
राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर असताना जरंडेश्वर आणि कन्नड साखर कारखान्यांचा लिलाव अल्प दरात करण्याचा आणि ते नातेवाईकांनाच विकल्याचा आरोप अजित पवार यांच्यावर याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने दिलेले कर्ज थकीत केलेल्या साखर कारखान्यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, अत्यंत अल्प दरात या कारखान्यांची विक्री केली गेली आणि यातले काही कारखाने बँकेवर संचालकपदी असलेल्या नेत्यांच्या नातेवाईकांनी विकत घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्यावेळी शिखर बँकेच्या संचालक मंडळावर अजित पवार होते आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मार्फत अजित पवारांनीच कारखाने विकत घेतल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.
या कथित आर्थिक घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर दोन प्रकरणांमध्ये थेट आरोप करण्यात येत आहे.
मुंबई पोलिसांनी या प्रकरणी नि:पक्षपणे चौकशी केली नसल्याचा आरोप करत तक्रारदार शालिनीताई पाटील यांच्यासह इतर तीन जाणांनी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्ट विरोधात विशेष न्यायालयात याचिका दाखल केली आहे
“सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर असताना जरंडेश्वर साखर कारखान्याचा लिलाव अल्प दरात करणे आणि आपल्याच नातेवाईकांना कारखाना विकणे.”व”कन्नड साखर कारखाना लिलावात विक्रीला काढणे आणि आपल्याच पुतण्याच्या कंपनीला तो विकणे.”
सदरची याचिकेचे वकील माधवी अय्यप्पन हे आहेत,
या याचिकेत, अजित पवार शिखर बँकेवर असताना गरज नसतानाही जरंडेश्वर साखर कारखाना विक्रीसाठी काढण्यात आला. लिलावात विक्री करताना शेवटच्या क्षणी आलेल्या गुरू कमोडिटी प्रायवेट लि. या कंपनीला कारखाना अल्प दरात विकण्यात आला.”
“पण गुरू कमोडिटी प्रा. लि. कंपनीने हा कारखाना भाडेतत्वावर चालवण्यासाठी जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडला दिला. या कंपनीचे 99 टक्के शेअर्स हे अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांचो आहेत. शिवाय, या कंपनीला पैसे पुरवणारी जय अॅग्रोटेक प्रा. लि. या कंपनीत अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांचे 100 टक्के शेअर्स आहेत,”
शालिनीताई पाटील या वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आहे

शालिनीताई पाटील या वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आहेत.