कराडच्या “कृष्णा” सहकारी साखर कारखान्यावर”भाजप”ची सत्ता!
भाजपचे डॉ.अतुल भोसले यांचे वर्चस्व
सचिन तरंगे ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
कराड येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे डॉ. अतुल भोसलेंच्या सत्ताधारी सहकार पॅनेलचा दणदणीत विजय झाला आहे.
या सहकार पॅनेलचा सर्व 21 जागांवर विजय झाला, भाजपाच्या डॉ. अतुल भोसलेंकडून कारखाना हिसकावून घेण्याचे काँग्रेस माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व राज्य मंत्रिमंडळातील सहकार राज्य मंत्री विश्वजित कदम नेत्यांचे “सत्ता ताब्यात घेण्याचे राजकीय मनसुबे” कृष्णेच्या सभासदांनी उधळून लावले आहेत.
जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचा सर्व 21 जागांवर विजय
कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक 29 जून रोजी पार पडली.
त्यावेळी तब्बल 34532 सभासदांनी मतदान केले होते.
आता या निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. मतमोजणीचा निकाल जाहीर झाला आहे.
या निवडणुकीत भाजपचे डॉ. अतुल भोसले यांच्या सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने सर्व 21 जागांवर दहा हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे.
पृथ्वीराज चव्हाण आणि विश्वजित कदमांचे प्रयत्नांना अपयश-
सातारा-सांगली जिल्ह्यात 47145 सभासद असणाऱ्या कराडच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांच्या सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने दणदणीत विजयी मिळवला. कारखान्याची सत्ता भोसले गटाकडून दुसरीकडे जावी म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्व विरोधक एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र हे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी झाली.
ऐतिहासिक मताधिक्य –
या निवडणुकीत मिळालेलं मताधिक्य आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त आहे
दहा हजारांहून अधिक मताधिक्य या निवडणुकीत भाजपचे डॉ अतुल भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली पॅनल ला मिळाले आहे,त्यामुळे राजकीय विरोधक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व राज्यमंत्री अभिजित कदम यांना”राजकीय हादरा”बसला आहे.
माजी चेअरमन अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल आणि राज्यमंत्री विश्वजित कदम नेतृत्व करत असलेले रयत पॅनेल अशी आणखी दोन पॅनल रिंगणात आल्याने या निवडणुकीची चर्चा झाली.
निकालाचे विधानसभा निवडणुकीवर पडसाद
या निवडणुकीमुळे सातारा आणि सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले होते.
या निवडणुकीत मतदानही विक्रमी झाले. दिग्गजांचे विधानसभा मतदारसंघ या कार्यक्षेत्रात येत असल्याने सगळ्याच नेत्यांचे लक्ष या निवडणुकीकडे होते. मात्र भोसले गटाने मोठ्या फरकाने इतरांचा पराभव करत कृष्णाची सहकारी साखर कारखान्याची सत्ता पुन्हा एकदा मिळवल्याने आता विरोधकांची चिंता वाढली आहे. या निवडणुकीचे पडसाद आगामी विधानसभा निवडणुकीवर पडणार हे निश्चित असल्याचे मानले जात आहे.
भाजपाचे डॉ अतुल भोसलेची प्रतिक्रिया-
शेतकरी सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करणार
तसेच कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त कृष्णा सहकारी साखर कारखाना राजकारणाचा अड्डा बनवण्याचे षड्यंत्र अनेक राजकारण्यांचं होतं. मात्र सुज्ञ सभासदांनी तो डाव उधळून लावला असून यापुढील काळात शेतकरी सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करणार असल्याची प्रतिक्रिया विजयानंतर डॉ अतुल भोसले यांनी दिली
भाजपाचे डॉ अतुल भोसले हे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे ‘ जावई आहेत.
