15 जूननंतर सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क अनिवार्य*
*👉👉तुमच्याकडे असणाऱ्या सोन्याचे काय,👉 जाणून घ्या!*
*केंद्र सरकारने सोन्याचे दागिने आणि कलाकृतींवरील हॉलमार्किंग 16 जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच अर्थ व्यापाऱ्यांना 15 जूननंतर 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याचे दागिनेच विकण्याची परवानगी असेल.*
*👉ग्राहकांचे हित जोपासले जाणार!*
*हॉलमार्किंगमुळे कायद्यात ग्राहकांचे हित सुरक्षित राहील. कुठलाच व्यापारी ग्राहकांची फसवणुक करू शकणार नाही आणि सोन्याच्या शुद्धतेवर थर्ड पार्टीची गॅरेंटी असणार आहे.*
*👉तुमच्याकडे असणारे दागिने सुरक्षित!*
*हॉलमार्किंगमुळे घरात ठेवलेल्या सोन्याला काहीच फरक पडणार नाही. ग्राहक जुने दागिने कधीही विकू शकणार आहेत. कारण हॉलमार्किंग ही सोनारांना दागिने विक्रीसाठी अनिवार्य केली आहे.*
*👉दागिन्यांवर असणार ‘या’ खुणा*
*मॅग्नीफायींग ग्लासमधून बघितले तर दागिन्यांवर पाच खुणा दिसतील. यात बीआयएस लोगो, सोन्याची शुद्धता सांगणारा नंबर (22 कॅरेट), हॉलमार्किंग सेंटरचा लोगो, मार्किंगचे वर्ष, आणि दागिन्याचे आयडेंटिफिकेशन नंबर असणार आहे.*
*नोव्हेंबर 2019 मध्ये सरकारने सोन्याचे दागिने आणि कलाकृतींवरील हॉलमार्किंग 15 जानेवारी 2021 पासून अनिवार्य असेल अशी घोषणा केली होती. व्यापाऱ्यांच्या मागणीनंतर जूनपर्यंत मुदत वाढवण्यात आली.*
