“नोट बंदी” च्या काळात “नोटा बदलणाऱ्या” ची चौकशी!
बँकेतील सिसी टी व्ही फुटेज जतन करण्याच्या सूचना
सचिन तरंगे (शिव-कल्याण न्यूज नेटवर्क)
देशातील काळा पैसा रोखण्यासाठी केंद्र सरकारने 8 नोव्हेबर 2016 रोजी पाचशे व हजार रुपये च्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला.
त्या नोटा चलनातून बाद झाल्याने त्याच्या मोबदल्यात त्या बदलून घेण्यासाठी नागरिक व इतर यंत्रणांनी देशातील विविध बँकात गर्दी केली होती.
रिझर्व बँकेच्या आदेशानुसार देशातील व्यवसायिक बँकांनी नागरिक व ग्राहकांना,विविध संस्था खातेदारांना 8नोव्हेंबर 2016 ते 30डिसेंबर2016या कालावधीतील सिसीटीव्ही फुटेज जतन करण्याच्या सूचना व्यवसायिक बँकांना दिल्या आहेत.
या कालावधीतील किती नागरिकांना व किती प्रमाणात नोटा बदलून घेतल्या,त्यांच्याकडे उत्तप्पणाचा स्त्रोत काय आणि कसा आहे ,याची स्वतंत्र चौकशी विविध यंत्रणा मार्फत चालू केली आहे,त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नोटा बंदीच्या काळात ज्यांनी गैर मार्गाचा वापर केला आहे,याची पडताळणी करण्यासाठी या सीसीटिव्ही फुटेज चा उपयोग चौकशी यंत्रणा करणार आहे.
एटीएम व्यवहारावर शुल्क आकारणीचा रिझर्व बँकेचा निर्णय:-
देशातील ग्राहकांना स्वतःच्या बँकेच्या एटीएम वर पाहिले पाच व्यवहार मोफत असून यात मोठ्या शहरात इतर बँकेच्या एटीएम वर तीन व्यवहार तर लहान शहरात एकूण पाच व्यवहार मोफत असतील,
एटीएम वरील खर्च वाढल्यामुळे एका महत्वपर्ण समितीच्या अहवालात अतिरिक्त व्यवहारावर 20 रुपये शुल्क आकारण्याऐवजी 21रुपये आकारावेत अशी शिफारस केली आहे.
त्यामुळे रिझर्व्ह बँकेने 1जानेवारी 2022पासून प्रत्येक अतिरिक्त व्यवहारावर 21रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याचे कळविले आहे.
