Thu. Apr 30th, 2026

टीईटी सर्टिफिकेटची वैधता ही 7 वर्षांऐवजी आजीवन !

Spread the love

टीईटी सर्टिफिकेटची वैधता ही 7 वर्षांऐवजी आजीवन !

केंद्र सरकारचा महत्वपर्ण निर्णय

सचिन तरंगे (शिव-कल्याण न्यूज नेटवर्क)

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी टीईटीबाबत मोठी घोषणा केली आहे.
सरकारने शिक्षक पात्रता परीक्षा सर्टीफिकेटच्या वैधतेचा कालावधी आता वाढ करण्यात आली आहे.

सध्या टीईटी पात्रतेच्या सर्टीफिकेटची वैधता सात वर्षे इतकी आहे. यापुढे ती आजीवन असणार आहे.

पोखरियाल यांनी सांगितलं की, शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना रोजगारासाठी संधी वाढण्याच्या दिशेनं हे एक सकारात्मक पाऊल असणार आहे.

सरकारी शाळांमध्ये शिक्षक बनण्यासाठी धडपडणाऱ्या उमेदवारांना सरकारच्या या निर्णयाने दिलासा मिळाला आहे.

सन 2011 पासूनच्या टीईटी सर्टिफिकेटची वैधता ही 7 वर्षांऐवजी आजीवन लागू राहणार आहे.

Related Post

error: Content is protected !!