
निमसाखर येथे श्रेय वादाच्या लढाईतुन उत्तम जाधव याचा निघृण खुन करणारा टोळी प्रमुख राजेंद्र उर्फ राजू भाळे व त्याचे टोळीवर मोक्का ( मकोका ) कायदा अंतर्गत कारवाई…
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क)
वालचंदनगर पोलिसांनी मोक्का कायदा अंतर्गत सर्वात मोठी कारवाई केली असल्याची माहिती समोर आली आहे. दशहत वाढवून सातत्याने योजनाबद्ध गुन्हे करणाऱ्या 13 सदस्यावर मोक्का ( मकोका ) कारवाई करण्यात आली आहे. पुणे व सोलापूर जिल्ह्यामध्ये दशहत वाढवून सातत्याने योजनाबद्ध गुन्हे करणाऱ्या राजेंद्र व राजू महादेव बाळे यांच्या टोळीत 13 सदस्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमानुसार मकोका कारवाई करण्यात आली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार,उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड व वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी दिली.
२७ फेब्रुवारी २०२५ रोजी इंदापूर तालुक्यातील निमसाखर मध्ये उत्तम जालिंदर जाधव ( वय – ३४ रा. खोरोची ) यांची दगडाने ठेचून तसेच कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. हत्येमध्ये १३ आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षण राजकुमार डुणगे यांनी मुख्य आरोपी राजेंद्र उर्फ राजू महादेव महादेव भाळे ( रा.खोरोची ), रामदास उर्फ रामा शिवाजी भाळे ( रा.खोरोची ) शुभम उर्फ दादा बापू आटोळे ( रा.शेळगाव ) स्वप्निल बबन वाघमोडे ( रा.रेडणी ) नाना भागवत भाळे ( रा.खोरोची ) निरंजन लहू पवार ( रा.खोरोची ) तुकाराम ज्ञानदेव खरात ( रा.खोरोची ) मयूर उर्फ जिजा मोहन पाटोळे ( रा.निमसाखर ) अशोक बाळू यादव ( रा.शेळगाव ) धनाजी गोविंद ( रा. कारूऺडे, ता.माळशिरस, जि.सोलापूर ) सोमनाथ बबन पवार रा.कळंब ) सनी विलास हरिहर (रा.अन्थुर्णे ) अक्षय भरत शिंगाडे रा. शेळगाव ) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली आहे.
राजू भाळे याच्यावर १२ गुन्हे दाखल असो पुणे बस सोलापूर जिल्ह्यातील इंदापूर माळशिरस नातेपुते या भागांमध्ये वर्चस्व वाढविण्यासाठी नियोजनबध्द गुन्हे करीत होता. भाळेच्या टोळीला पायबंद घालण्यासाठी कारवाई केली.हि कारवाई पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, महेश बनकर, अभिजीत कळसकर, शैलेश स्वामी, गुलाबराव पाटील, जगदीश चौधर, विक्रमसिंह जाधव, गणेश काटकर, प्रेमा सोनावणे, सचिन खुळे यांनी केली.
