श्री. संत तुकाराम महाराज पालखीचे परतीच्या मार्गावर निमगाव केतकी येथे भव्य स्वागत

निमगाव केतकी ( ता. इंदापूर ) येथे श्री. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा परतीच्या मार्गावर समस्त निमगाव केतकी ग्रामस्थांनी पालखीचे भव्य स्वागत केले. वारकऱ्यांना निमगाव केतकी येथील रामचंद्र व गिरीजा हेगडे व परिवार यांनी अन्नदान केले.
श्री. संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन व अभिषेक सुयश विनायक बोराटे व कल्याणी भोसले /बोराटे या उभयतांच्या हस्ते व उर्मिला बोराटे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
रामचंद्र व गिरीजा हेगडे, सुशीला व रेखा भोसले, अभिजीत व राजश्री हेगडे, अमोल व रश्मी हेगडे, कुलदीप हेगडे, अरुण व जया, सई दंडीले, शुभम दंडिले, आप्तेष्ट व नातेवाईक, ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
