बोराटवाडी मध्ये कृषी शिक्षण दिन साजरा

लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कृषीदूतांमार्फत कृषी शिक्षण दिन साजरा
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क ) दि. 4 :
बोराटवाडी ता. इंदापूर जि. पुणे येथे बारामती येथील डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षांच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या जयंती दिनानिमित्त कृषी शिक्षण दिन साजरा केला. या कार्यक्रमासाठी बोराटवाडीच्या लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक श्री आवारे सर, शिक्षक श्री.रणमोडे सर, श्री. खाडे सर, श्री शिंदे सर व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी पूर्णपणे सहभाग नोंदवला. कृषी क्षेत्रातील विविध संधी व विद्यार्थ्यांमध्ये कृषी क्षेत्राविषयी आवड निर्माण व्हावी हा हेतू लक्षात घेऊन कृषी शिक्षण दिन साजरा केला. विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्राचे महत्त्व पटवून देण्यात आले. शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली.
प्रसंगी संस्थेचे मुख्याधिकारी प्रा.एस. पी. गायकवाड सर व एस. व्ही. बुरुंगळे सर तसेच गावचे सरपंच श्री.दत्तु यशवंत सवाशे व उपसरपंच श्री.अभिजीत विठ्ठल फडतरे, ग्रामसेवक श्री.भाऊसाहेब सव्वाशे व इतर ग्रामस्थ यांचे मार्गदर्शन लाभले.
