Fri. Apr 17th, 2026

बोराटवाडी मध्ये कृषीदूतांचे स्वागत

Spread the love

बोराटवाडी मध्ये कृषीदूतांचे स्वागत

screenshot 20241202 063646 photos

( शिव-कल्याणन्युजनेटवर्क )

दि. २८/११/२०२४ : बोराटवाडी ता.इंदापूर जि. पुणे येथे डाॅ.शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत बोराटवाडी येथे दाखल झाले असून, ग्रामस्थांच्या वतिने त्यांचे स्वागत करण्यात आले. यामध्ये कृषीदुत ओमकार झेंडे, संकेत झेंडे, निर्भय शेंडगे, मंगेश कामठे, मनोज लडकत, गिरीश शितोळे,प्रणित ननावरे, शंकरानंद स्वामी यांचा समावेश असून हे तीन महिने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रम व प्रात्यक्षिके दाखविणार आहेत.

त्यात विविध पिकांचे लागवड तंत्रज्ञान, पिकांवर येणारे रोग व कीड यांची माहिती व व्यवस्थापन, जनावरांची काळजी व संगोपन शेतीशी निगडित विविध समस्यांचे निराकरण, बीजप्रक्रिया या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. या प्रसंगी संस्थेचे प्राचार्य प्रा.एस. पी. गायकवाड सर व एस. व्ही. बुरुंगळे सर तसेच गावचे सरपंच श्री.दत्तु यशवंत सवाशे व उपसरपंच श्री.अभिजीत विठ्ठल फडतरे, ग्रामसेवक व इतर ग्रामस्थ उपस्थित होते व या कार्यक्रमाला यांचे मार्गदर्शन लाभले.

या कार्यक्रमअंतर्गत विद्यार्थ्यांकडून ग्रामस्थांना जातीवंत केशर आंब्याची रोपे देण्यात आली. ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्येक्रम कसा राबवण्यात येईल याबद्दल माहिती सांगण्यात आली व त्यानंतर मान्यवरांचे वा ग्रामस्थांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Post

error: Content is protected !!