Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/class-wp-http-encoding.php on line 1
बिरुगुडवाडी ग्रामस्थांचे प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण - संपादक :- शहाजीराजे भोसले
Mon. Jun 8th, 2026

बिरुगुडवाडी ग्रामस्थांचे प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण

Spread the love

बिरुगुडवाडी ग्रामस्थांचे प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण

screenshot 20241208 141450 whatsapp

शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

अवैधरित्या गौणखनिज उत्खनन करणाऱ्या विरुद्ध कारवाईची मागणी

रेडा : मौजे बिरुगुडवाडी(कळस)ता-इंदापूर येथील जमीन
गट नं.२९५ मध्ये मोहन बाबू सांगळे,सोमनाथ मोहन सांगळे,भारत मोहन सांगळे सर्व रा.बिरूगुडवाडी यांनी महसूल विभागाकडून रीतसर परवानगी न घेता ३,२८७ ब्रास अवैध गौणखनिज(माती,मुरुम,दगड)उत्खनन केलेले आहे.या जमीन गट नं.२९५ मध्ये वरील संबंधितांनी केलेल्या ३,२८७ ब्रास अवैध गौणखनिज उत्खननास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदीनुसार पाचपट दंडात्मक कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी यशोदा नवनाथ सांगळे व सहकुटुंब(रा.बिरुगुडवाडी ता.इंदापूर)यांचे उपविभागीय अधिकारी बारामती यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु आहे.

मोहन सांगळे,सोमनाथ सांगळे,भारत सांगळे यांचे देखील उपविभागीय अधिकारी बारामती यांच्या कार्यालयासमोर बिरुगुडवाडी येथील खडीक्रशर विरोधात आमरण उपोषण सुरू आहे.परंतु मोहन सांगळे,सोमनाथ सांगळे,भारत सांगळे यांनीच गट नंबर २९५ मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज उत्खनन केलेले असून त्यांनी केलेल्या अवैध गौण खनिज उत्खननास पाचपट दंडात्मक कारवाई करावी या मागणीसाठी यशोदा सांगळे या संपूर्ण कुटुंबासह प्रांत कार्यालयासमोर गेली दोन दिवसापासून आमरण उपोषण करीत आहेत.यशोदा सांगळे यांच्या आंदोलनास मी आंबेडकरवादी सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य,साद फाऊंडेशन इंदापूर,रिपब्लिकन युथ फाउंडेशन या सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे.

Related Post

error: Content is protected !!