उसाच्या एका खेपे मागे दोन टनाचा मलिदा कोणी खाल्ला? – हनुमंत कोकाटे

वालचंदनगर, दि. १८ : इंदापूर तालुक्यात उसाच्या एका खेपे मागे दोन टनाचा मलिदा यांनी खाऊन शेतकरी व कारखाने कमजोर केले. तसेच वीस वर्षे मंत्री असताना फक्त मेव्हण्यालाच मलिदा चारला, अशा शब्दांत इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा समाचार घेतला. ते शुक्रवारी (दि.१८)पत्रकार परिषदेत बोलत होते.
आमदार दत्तात्रय भरणे जन्मले होते तेव्हापासून त्यांच्या घराण्याकडे चार चाकी गाड्या होत्या. त्यांचा पंधरा ते वीस हजार टन ऊस त्यावेळेस जात होता तर हर्षवर्धन पाटील यांना गड्याचा पगार करायला पैसे नसायचे, तरी देखील आता त्यांच्याकडे चार कोटीच्या किती गाड्या तसेच मुंबई, पुणे ,बावडा, इंदापूर, शहाजीबाग एवढ्या ठिकाणी बंगले कसे बांधले, याचा त्यांनी जनतेला खुलासा करावा असे ही ते म्हणाले.
यावेळी नवनाथ रुपनवर, ननवरे आप्पा, अनिल राऊत, सुधीर मखरे, दादासाहेब सोनवणे, माळुंजकर, विठ्ठल माळी उपस्थित होते.
