Thu. Apr 16th, 2026

आमदार भरणेंना पडला महायुतीचा विसर !

Spread the love

आमदार भरणेंना पडला महायुतीचा विसर !

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

इंदापूर तालुक्याचे आमदार यांनी संपूर्ण इंदापूर तालुक्यामध्ये प्रत्येक घरामध्ये हे पत्रक वाटप केलेले आहे की, घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा. वास्तविक मतदान मागत असताना महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी करा, असे म्हणायला हवं होतं. तसेच प्रोटोकॉल नुसार माननीय भारत देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र जी मोदी साहेब यांचा फोटो नाही. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे शिवसेना शिंदे गटाचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचाही फोटो नाह त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचाही फोटो त्या ठिकाणी पत्रकावर नाही. आणि एका बाजूला माहिती म्हणून तुम्ही आमच्या दोन्ही गटाला एकत्र मिळून काम करू, असे आपण या ठिकाणी आश्वासित करत असताना त्या ठिकाणी आमच्या सर्व नेत्यांचे अवमान करायचे.

तसेच इंदापूर तालुक्यामध्ये प्रत्येक गावात जाऊन जो केंद्र सरकारने निधी दिलेला आहे तो 14 वित्त आयोग असो किंवा 15 वित्त आयोग असो, पालखी मार्ग साठी 1500 कोटीचा असो, किंवा कोट्यावधीचा निधी असो, इंदापूर तालुक्यासाठी सर्वांगीण विकासासाठी व इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी शेतकरी सन्मान निधी असेल, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल अशा प्रकारचे प्रचंड योजना आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी माननीय भारत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र जी मोदी व देशाचे अर्थमंत्री निर्मलाजी सिता रामन यांनी महाराष्ट्र करिता दिला.

हे इंदापूर तालुक्याचे आमदार माझ्या माहितीप्रमाणे विसरले आहेत. हा सर्व निधी माननीय भारत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी दिलेला आहे आणि त्याची जाहिरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार स्वतःचे पाठ थोपटून घेण्यात मग्न झालेले दिसत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला चोरीछुपे एकट्याने फक्त राष्ट्रवादीसाठी मत मागायचे हा महायुतीचा धर्म नसून हा अधर्म आहे म्हणून आम्ही इंदापूर तालुक्याचे आमदार यांचा जाहीर निषेध करतो असे भाजपा युवा मोर्चाचे नेते रणजितकाका अर्जुन-पाटील यांनी सांगितले.

Related Post

error: Content is protected !!