माती परीक्षण काळाची गरज! कृषी दुतांचे शेतकऱ्यांना आवाहन

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविदयाल बारामतीतील विद्यार्थ्यांनी ,रेडणी (इंदापूर) येथे ग्रामीण कृषी कार्यनुभव कार्यक्रमा अंतर्गत शेतात जाऊन शेतकऱ्यांशी
संवाद साधुन शेतक-यांना माती परिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
माती परिक्षणामुळे पिकांना लागणारी खताची मात्रा ठरवता येते व त्यामुळे गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण करता येते. तसेच माती परिक्षणामुळेमाती मध्ये कोणत्या घटकाची कमतरता आहे याबद्दल माहिती मिळते.
माती परिक्षण करुन त्यानुसार केलेल्या पिक लागवडीमुळे भरघोस आर्थिक उत्पन्न मिळवता येते. माती परीक्षण केल्याने शेताच्या मातीत कोणत्या पीक पोषक तत्त्वाची कित्ती मात्रां आहे हे कळते व त्यानुसार खते व इतर पोषक द्रव्यांची उपाययोजना करता येते.
सदर कार्यक्रम घेण्यात कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य, संस्थेचे मुख्याधिकारी प्रा. एस. पी. गायकवाड व एस. व्ही. बुरुंगळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे कार्यक्रमावेळी या प्रसंगी कृषीदूत अभिजीत काळे, साईराज शिंदे, पार्थ शिंदे, रितेश बांबळे, प्रथमेश दळवी, दिनेश रेड्डी, इमानी व्यंकटेश, ऋषी पाठक उपस्थित होते.
