Fri. Apr 24th, 2026

कळंब येथे ‘शरद पवारांचे’ भव्य स्वागत !

Spread the love

कळंब येथे ‘शरद पवारांचे’ भव्य स्वागत !

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

इंदापूर तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा प्रश्न, गुरांचा चारा आदी प्रश्न गंभीर असताना सरकारने त्याची दखल घेतली नसल्याने, इंदापूर तालुक्यातील निरवांगी, खोरोची, बोराटवाडी या नदीकाठच्या गावांना मोठ्या दुष्काळाच्या झळा बसल्यामुळे, देशाचे नेते शरद पवार यांनी दिनांक 12 जून रोजी गावभेट दौरा आयोजित केला होता.

यावेळी गावभेट दौऱ्याला जाताना कळंब येथे मतदार तरुण वर्ग मोठ्या संख्येने त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होता. यावेळी कळंब ग्रामपंचायत व रुद्र किराणा स्टोअर्स च्या समोर रणरागिनी स्वाती दीपक चव्हाण, शुभांगी विजय महाडिक, स्वाती संजय कदम यांनी महिलांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन तसेच दादासाहेब हनुमंत डोंबाळे, अमोल चव्हाण, कळंब सोसायटीचे संचालक सोमनाथ घोडके, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद खंडागळे, सागर कोळी, ऋषी नलवडे, अजित माने, सुबोध घोडके आदींनी घोंगडी काठी पुष्पगुच्छ देऊन तसेच शिवकल्याण संस्था समूहाच्या वतीने अशोक जाधव, शहाजीराजे भोसले, महादेव पवार, पांडुरंग जगदाळे, प्रशांत खंडागळे, विशाल वाघमोडे, प्रथमेश मोहिते, ओम चव्हाण आदींनी शिवप्रतिमा, पुष्पगुच्छ, फेटा व श्रीफळ देऊन पवार साहेबांचे भव्य स्वागत केले.

यावेळी ॲड. तेजसिह पाटील, महारुद्र पाटील, सागर मिसाळ, कळंबचे सरपंच अतुल सावंत आदी मान्यवर व कळंब मधील तरुण वर्ग, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Post

error: Content is protected !!