Fri. Apr 24th, 2026

इंदापूरच्या ‘लोकहितासाठी ‘ सुप्रिया सुळेंना मतदान करा – अमोल भिसे 

Spread the love

इंदापूरच्या ‘लोकहितासाठी ‘ सुप्रिया सुळेंना मतदान करा – अमोल भिसे

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

इंदापूर च्या लोकहितासाठी व राज्यात देशात इंडिया आघाडी चे सरकार आणण्यासाठी बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया ताई सुळे यांना विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य अमोल भिसे यांनी केले.

गुरुवार दिनांक 02 मे 2024 रोजी रेडणी (ता. इंदापूर )येथे बारामती लोक सभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य अमोल भिसे म्हणाले की, देशाचे नेते शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांना संसदेत लोक प्रतिनिधी म्हणून काम करण्याचा ‘राजकीय अनुभव ‘आहे. राज्यसभा सदस्य, म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. 2009,2014,2019 या तीन टर्म त्यांनी संसद सदस्य म्हणून काम पाहिले आहे.सुप्रिया सुळे यांची विचारधारा ही पवार साहेबांच्या विचारधारा ह्या एकच आहेत.

देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांनी महाराष्ट्रात धनगर समाजाला एनटी क प्रवर्गात, तर वंजारी समजा ला ही आरक्षणात घेतले. अनेक लहान लहान समाजास आरक्षणात घेतले.
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी त्यांनी दिली, रस्ते, वाहतूक, दळण वळणाची, व्यवस्थे बरोबर आद्योगिक वसाहतीत छोटे मोठे उद्योग आणले. रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली.

आजपर्यंत पवार कुटुंबीय आपल्या पाठीशी उभे राहिले, आता आपण सुप्रिया सुळे मतदान करून त्याच्या पाठीशी उभे राहुयात, तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हावर बटन दाबून त्यांना विजयी करण्याचे आवाहन अमोल भिसे यांनी केले.

यावेळी शरयू फाउंडेशन च्या अध्यक्षा शर्मिली पवार,करमा ळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, तेजसिह पाटील,यांची भाषणे झाली.

या वेळी रेडणी ग्रामस्थांच्या वतीने भारतीय काँग्रेस पक्षांचे तालुका उपाध्यक्ष नितीन सोनवले, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख अमोल मुळे, ज्ञानदेव हाके यांनी मनोगत व्यक्त केले.

Related Post

error: Content is protected !!