इंदापूर शेतकऱ्याच्या हक्काच्या पाण्यासाठी लढणार – प्रभाकर देशमुख.
पुढील आठवड्यात इंदापूर तहसील कार्यालयासमोर आंदोलन!
सचिन तरंगे ( शिव-कल्याण न्यूज नेटवर्क)
उजनी धरणाच्या पाच टीएमसी पाण्यासाठी लढा उभारला नसता तर सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कर्जबाजारी होऊन देशोधडीला लागला असता, जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेती उध्वस्त झाली असती, तरीही हा लढा मी चालूच ठेवणार आहे.
आता इथून पुढे इंदापूरच्या शेतकऱ्यासाठी लढा उभारला जाईल,या करीता मी इंदापुरात आंदोलन करणार असल्याचे जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी स्पष्ट केले.
प्रभाकर देशमुख पुढे म्हणाले की,
खडकवासला धरणातून इंदापूर तालुक्यातील 22 गावासाठी शरद पवार यांच्या प्रयत्नातून पाण्याची तरतूद केली होती,तरीही 22 गावांना पाणी मिळाले नाही.
ते पाणी मिळविण्यासाठी पुढील आठवड्यात इंदापूर तहसील कार्यालयासमोर इंदापूर तालुक्यातील 22 गावांतील शेतकऱ्यासाठी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
