Fri. Apr 24th, 2026

कळंब येथे श्रीराम मंदिर लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

Spread the love

कळंब येथे श्रीराम मंदिर लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

कळंब, (ता.इंदापूर ) येथे नवीन बांधलेल्या श्रीराम मंदिराचा लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवार, दि.२२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १ वा. कळंब वासियांच्या साक्षीने संप्पन्न झाला. यानिमित्त कळंब मधील व परिसरातील मोठ्या संख्येने अनेक रामभक्त कळंब येथील श्रीराम मंदिरामध्ये उपस्थित होते.
यावेळेस मंदिरा समोर अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे टि.व्ही. स्क्रीन व्दारे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.

रविवार, दि.२१ रोजी सायंकाळी ६ ते १० पर्यंत घोड्यांच्या रथातून राजस्थान वरून आणलेल्या प्रभु रामचंद्र, सिता, लक्ष्मण, हनुमान या नवीन मुर्तींची भव्य मिरवणूक डी.जे, वाजंत्री, हालगी, शिवकालीन मर्दानी खेळ, फटाक्यांच्या आतषबाजीत कळंब मधील डी.पी.चौकातून व गावातून वाजत गाजत जल्लोषात काढण्यात आली.

सोमवार, दि. २२ रोजी सकाळी ७ वाजता होम हवन, मंत्र पठण व पुजा अर्धा करीत दु. १ वाजता नवीन मुर्तींची प्रतिष्ठापना आरती करून करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने रामभक्तांनी जय जय श्रीरामाचा जयघोष करीत, आनंदी भक्तिमय वातावरणात या सुंदर क्षणाचा व प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापनेचा क्षण, प्रसंग आणि ते वैभव आपल्या डोळ्यामध्ये साठवून रामभक्तांनी श्रीरामाचे दर्शन घेतले.

या सोहळ्यास इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे मामा यांनी हजेरी लावत, महिलांमध्ये बसून राम नामाचा जयघोष केला, व मंदिरास उर्वरित कामासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याचे ग्रामस्थांना आश्वासन दिले.
तसेच श्रीराज भरणेंनीही उपस्थिती लावून प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले.
ह्या सोहळ्यास प्रदिप कल्याणकर,सुधीर डोंबाळे,अशोक चव्हाण,अनंता इंगळे,अशोकशेठ शहा,शहाजीराजे भोसले,बाळु डोंबाळे,हनुमंत राऊत,प्रदिप तेरखेडकर, राजेंद्र कोळी,शिवाजी कोळी, सुनिल मस्के,किसन जाधव तसेच बजरंग दलाचे अध्यक्ष संदीप कोकरे,सौरभ चव्हाण,ओम चव्हाण,अमोल वरूडकर,बबलू लकडे,वैभव काटकर, अमेय चव्हाण,बंटी चव्हाण,अक्षय डोंबाळे,पंकज डोंबाळे,साहिल खरात, ओंकार खिलारे,राहुल मोहिते,किशोर शिर्के,हर्षवर्धन हारमोडे,रोहित निटवे,राजेश माने,अजिंक्य कोळी तसेच सकल हिंदू समाजाचे विजय कल्याणकर,डाॅ.सुधीर कल्याणकर,डाॅ.अर्चना कल्याणकर,महादेव पवार,प्रसाद तेरखेडकर,आशिष डोंबाळे,आप्पा लोहार,विक्रांत सावंत,बाबा वाघमोडे,वैभव चव्हाण,नवनाथ बेलपत्रे,चैतन्य वाघ,अभिजित सोलनकर,विराज मोहिते,आकाश डोंबाळे,महेश बेलपत्रे,निखिल लाठोर व श्रीराम भजनी मंडळाचे विलास डोंबाळे,अनिल सुतार,सुनिल घोडके,राजेंद्र सुतार,संजय डोंबाळे,शंकर घोडके, मनिष जकाते काका, एम. के. कन्स्ट्रक्शन आणि
ब्रम्हचैतन्य जप संकुलाच्या रत्नप्रभा चव्हाण, रेखा वाघ,रंजना लोहार,मंदा कुंभार,नंदा लोहार,मंगल देशमाने आदींनी परिश्रम घेतले. दुपारी २ ते संध्या. ९ पर्यंत रामभक्तांनी महाप्रसादाचे लाभ घेतला. श्रीराम मंदिराच्या प्रांगणात सायंकाळी ७ वाजता दीपोत्सव साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास अशोक डोंबाळे-पाटील,सुहास डोंबाळे,सरपंच विद्या सावंत,अतुल सावंत,राजकुमार कल्याणकर, संजय खरात,योगेश डोंबाळे,राजेंद्र (पिंटु) डोंबाळे, गणेश चव्हाण,डाॅ.ज्योतीराम देसाई,महेश कळसकर डाॅ. नारायण लाठोर, रेशमा गुलाब डोंबाळे आदी मान्यवर व  ग्रामस्थ तसेच परिसरातील रामभक्त उपस्थित होते.

Related Post

error: Content is protected !!