
रणसिंग महाविद्यालयातमाजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून गरजूंना माणुसकीचा आधार
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
कळंब ता. इंदापूर येथील विश्वासराव रणसिंग कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना यांच्या वतीने इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संस्थेचे सचिव वीरसिंह रणसिंग यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील गरजूंना जीवनावश्यक वस्तू व साहित्याचे वाटप माणुसकीची भिंत या उपक्रमातुन करण्यात आले. यावेळी चाळीस गोरगरीब ऊसतोड कामगार जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून या भागात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.यावेळी आरोग्य तपासणी व प्रश्नमंजुषा उपक्रम घेण्यात आला. माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष विरसिंह रणसिंग,उपाध्यक्ष प्रकाश कदम ,सचिव प्राचार्य डॉ. अंकुश आहेर,खजिनदार प्रा.ज्ञानेश्वर गुळीग,सदस्य श्रीनिवास फडतरे ,संदीप डोंबाळे ,सागर पाटील ,अक्षय कुलकर्णी ,मंगेश पाटील,सदस्या प्रा. डॉ. तेजश्री हुंबे ,सदस्या अनघा भोसले यांनी समाजातील सामान्य कुटूंबाला मदत व्हावी या उद्देशाने एक हात मदतीचा देत सामाजिक बांधिलकी च्या जाणिवेतून माणुसकी ची भिंत हा उपक्रम मागील चार वर्षांपासून यशस्वी सुरु केला असल्याचे सांगितले.

माणुसकीची भिंत उपक्रमाचे चौथे वर्ष असून इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव विरसिंह रणसिंग यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील गरजूंना व उसतोड कामगारांना जीवनावश्यक वस्तू ( अन्नधान्य ,शालेय साहित्य, कपडे ,चप्पल ) चे वाटप इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान अध्यक्षा आनंदी रणसिंग, उपाध्यक्ष प्रकाश कदम , संस्था सचिव विरसिंह रणसिंग, विश्वस्त शंकरराव रणसिंग,विश्वस्त राही रणसिंग ,प्राचार्य अंकुश आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष विरसिंह रणसिंग यांनी या वर्षी माणुसकीची भिंत तसेच आरोग्य तपासणी यामध्ये हिमोग्लोबिन ,थायरॉइड तपासणी व विद्यार्थ्यांच्यासाठी प्रश्नमंजुषा उपक्रम संघटनेच्या माध्यमातून घेतले असल्याचे सांगितले. माणुसकीची भिंत उपक्रमातून सामान्य कुटूंबातील व्यक्तीना मदतीचा हात दिल्याने कुटूंबातील व्यक्तीना मायेची व आपुलकीची मदत केल्याचे समाधान लाभत असल्याने माजी विद्यार्थी संघाच्या विविध उपक्रमातून समाज उपयोगी कार्य कायमस्वरूपी सुरु राहणार असल्याचे सांगितले.

महाविद्यालयात माणुसकीची भिंत उपक्रम संस्थेच्या माध्यमातून उपेक्षित गोरगरिबांना मदत व्हावी यासाठी सुरू केला आहे.परिसरातील ऊसतोड मजुरांना साहित्याचे वाटप उस फडात जाऊन करण्यात येणार असल्याची माहिती इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव विरसिंह रणसिंग यांनी दिली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आनंदी रणसिंग, उपाध्यक्ष प्रकाश कदम,विश्वस्त शंकरराव रणसिंग ,विश्वस्त राही रणसिंग यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

याप्रसंगी प्राचार्य डॉ.अंकुश आहेर ,उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग,मुख्याध्यापक मारुती वणवे ,प्रमोद भोंग ,माजी मुख्याध्यापक महादेव वणवे ,प्रा.डॉ.रामचंद्र पाखरे,डॉ.विजय केसकर, प्रा.डॉ. विलास बुवा,प्रा.डॉ.सुहास भैरट,डॉ प्रा.प्रशांत शिंदे, प्रा.ज्योत्स्ना गायकवाड ,प्रा.राजेंद्रकुमार डांगे,प्रा.विनायक शिंदे ,प्रा.डॉ.तेजश्री हुंबे, प्रा. सचिन आरडे ,प्रा. गणेश ठोंबरे,प्रा.नम्रता सपकळ, प्रा.महादेव माळवे,प्रा. कपिल कांबळे, प्रा.विद्या गुळीग,शिक्षकेतर कर्मचारी सुभाष भंडलकर,मनोहर भादेकर,संतोष जाधव,संदीप सूर्यवंशी,इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
