वारकरी साहित्य परिषदेच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी राजेंद्र घोरपडे

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी घोरपडवाडी (ता.इंदापूर)येथील ह भ प राजेंद्र महाराज दुर्योधन घोरपडे यांची निवड करण्यात आली आहे.
पुणे येथे शनिवार दिनांक २५ रोजी झालेल्या वारकरी साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे 10 वे वंशज हभप संभाजी महाराज मोरे यांच्या हस्ते आध्यात्मिक व सांप्रदायिक क्षेत्रात केलेल्या व करत असलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत ह भ प राजेंद्र महाराज दुर्योधन घोरपडे यांना वारकरी साहित्य परिषदेच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले. घोरपडवाडी चे राजेंद्र जगदाळे यांची सचिव पदी देखील निवड करण्यात आली आहे.
घोरपडे व जगदाळे यांच्या निवडीनंतर सांप्रदाय क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
