राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) महिला आघाडी च्या “तालुकाउपाध्यक्ष” पदी शोभा देविदास माने यांची नियुक्ती!

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते इंदापूर येथे शहा सांस्कृतिक भवन कार्यालयात शोभा देविदास माने यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा (शरद पवार गट) च्या महिला आघाडी च्या तालुकाउपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी माजी जि प बांधकाम सभापती प्रविण माने,सामाजिक न्याय विभागाचे पुणे जिह्वाध्यक्ष सागर मिसाळ, तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटील , कार्याध्यक्ष महारुद्र पाटील,माजी जि प सदस्य
अमोल भिसे,रेहाना मुलांनी,तालुकामहिला अध्यक्षा छाया ताई पडसलकर,मान्यवर उपस्थित होते.
दि. 23 नोव्हेंबर रोजी इंदापूर येथे शहा सांस्कृतिक भवन कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात अनेक नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर बाबा मिसाळ , राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष एडवोकेट तेजसिंह पाटील, तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तालुका अध्यक्ष छायाताई पडसळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या अत्यंत निकटवर्ती य म्हणून त्यांची ओळख आहे.
