इंदापूर तालुक्यातील “कोतवाल “रिक्त पदाची आरक्षण सोडत 21 सप्टेंबर ला होणार !
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
इंदापूर तालुक्यातील एकूण 16 कोतवाल पदे रिक्त असून सदर रिक्त पदे भरण्या करिता समिती गठीत केली आहे.
त्या अनुषंगाने मा. सहाय्यक आयुक्त पुणे (मागासवर्ग कक्ष)यांचेकडील मंजूर बिंदू नियमावली प्रमाणे कोतवाल रिक्त सजांची आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निवड समितीच्या उपस्थिती त ‘तहसील कार्यालय इंदापूर, प्रशासकीय भवन येथे गुरुवार, दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता काढण्यात येणार आहे.
इंदापूर तालुक्यातील भिगवण, तक्रारवाडी,शेटफळ गढे, निरगुडे,इंदापूर, हिंगणगाव,वरकुटे ब्रु, नीर निमगाव,रेडा, खोरोची, व्याहाळी,शेळगांव, कळस, निंबोडी,काझड, कुरवली या 16 सजांचा समावेश आहे.
