Thu. Apr 23rd, 2026

मराठा आंदोलकांवर पोलीसांकडून झालेल्या दुर्दैवी लाठीचार्ज विरोधात इंदापूर बंदची हाक 

Spread the love

मराठा आंदोलकांवर पोलीसांकडून झालेल्या दुर्दैवी लाठीचार्ज विरोधात इंदापूर बंदची हाक

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

जालना जिल्ह्य़ातील अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा आरक्षण या मागण्यासाठी उपोषणास बसलेल्या मराठा तरुणावर पोलिसांकडून लाठी चार्ज करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ सोमवार, दि. 4 सप्टेंबर रोजी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने इंदापूर शहर व तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच सकाळी 11 वाजता पंचायत समिती इंदापूर समोर समस्त सकल मराठा समाजाच्या वतीने रस्ता रोको करण्यात येणार आहे. या संदर्भातील लेखी निवेदन इंदापूर तहसील कार्यालय आणि इंदापूर पोलीस विभागात देण्यात आले आहे.

पोलिसांच्या माध्यमातून अचानक हल्ला करून लोकशाही शांततेच्या मार्गाने चाललेले आंदोलन मोडीत करण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून मराठा आरक्षण देण्याऐवजी उपोषणकर्त्यावर हल्ला केला यामध्ये अनेक लोक गंभीर रखमे झाले आहे सदर घटनेचा निषेध म्हणून इंदापूर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने व मराठा क्रांती मोर्चा इंदापूरच्या वतीने संपूर्ण इंदापूर तालुका सोमवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी बंद आवाहन केले आहे.

सदरची झालेली घटना निषेधार्य असून, या सर्व बाबी हल्ला करणाऱ्या व हल्ल्याचा आदेश देणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षण त्वरित लागू करावे या मागणीसाठी इंदापूर तालुका व इंदापूर शहर बंद व रस्ता रोको या स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे.

Related Post

error: Content is protected !!