शिष्यवृत्ती परीक्षेत जि.प.शाळा, लालपुरीच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
कळंब ( ता.इंदापूर ) येथील लालपुरीच्या जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेकडुन घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा-२०२२ मध्ये उज्ज्वल यश संपादन केले.
परीक्षेत बसलेल्या अकरा विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले. शाळेचा शेकडा निकाल ४५ टक्के लागला.
पात्र विद्यार्थ्यांना २९८ पैकी पुढील प्रमाणे गुण मिळाले.
आर्यवीर संदीप येवले – २५२
प्रांजली श्रीरंग वाघमोडे – १७४
कार्तिकी किसन निटवे – १७२
श्रेया बाळासाहेब अर्जुन – १४०
रूतुजा संभाजी बंडगर – १२८
शाळेचे मुख्याध्यापक अनिल दिवसे, वर्गशिक्षक संदीप येवले, सहकारी शिक्षक सहदेव शिंदे, अजित भोसले, अलका ठोंबरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच केंद्र प्रमुख मारूतराव सुपुते, सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, ग्रामस्थ आदींनी या यशाबद्दल कौतुक केले.
