उजनीच्या पाण्यासाठी कळंबमध्ये जागरण गोंधळ घालून केले रस्ता रोको आंदोलन
कळंब – वालचंदनगर परिसरातील युवकांनी नीरा नदीच्या पुलावर ग्रामपंचायत सदस्य योगेश डोंबाळे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या अनोख्या आंदोलनात जागरण गोंधळ घालण्यात आला. यामध्ये ‘ सरकारला सुबुद्धी दे, शेतकऱ्यांना न्याय मिळू दे ‘ असे देवाला साकडे घातले.
तर उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनीच्या पाण्याबाबत फेरविचार करावा अशी मागणी केली. यावेळी सरपंच अतुल सावंत,ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील, महेश बोंद्रे, कळंब सोसायटीचे माजी चेअरमन संजय खरात, देविदास केदार,पंकज डोंबाळे,विनोद वरुडकर,गणेश लंबाते,सागर खरात,बबलु लकडे,संजय निटवे,भालचंद्र काटकर आदी युवा शेतकरी उपस्थित होते.
