Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/class-wp-http-encoding.php on line 1
वनपरिक्षेत्रात चिंकाराची शिकार दोघे अटकेत, वनविभागाची कारवाई , बंदुकीसह दुचाकी जप्त... - संपादक :- शहाजीराजे भोसले
Mon. Jun 8th, 2026

वनपरिक्षेत्रात चिंकाराची शिकार दोघे अटकेत, वनविभागाची कारवाई , बंदुकीसह दुचाकी जप्त…

Spread the love

वनपरिक्षेत्रात चिंकाराची शिकार
दोघे अटकेत,
वनविभागाची कारवाई ,
बंदुकीसह दुचाकी जप्त……

पुणे : इंदापूर वनपरिक्षेत्रात कळस-काझड परिसरात चिंकारा जातीच्या हरणाची शिकार करून पसार झालेल्या दोघांना वनविभागाच्या पथकाने पाठलाग करून पकडले.
त्यांच्याकडून बंदूक, सहा काडतुसे, दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी महेश जंगलू मने
(वय ४०, रा. सणसर, ता. इंदापूर, जि. पुणे)
आणि दत्तात्रय पोपट पवार
(वय ४२, रा. बोरी, ता. इंदापूर, जि. पुणे)
यांना अटक करण्यात आली.
दोघांविरोधात भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदापूर वनपरिक्षेत्रातील कळस-काझड परिसरातील रस्त्यावर वन विभागाच्या पथकाकडून गस्त घालण्यात येत होती.
त्या वेळी मने आणि पवार अंधारातून निघाले होते.
त्यांच्या दिशेने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विजेरीतून प्रकाशझोत सोडला.
वनविभागाचे पथक मागावर असल्याचे समजताच दोघे जण दाट झाडीत पळाले.
वनविभागाच्या पथकाने पाठलाग करू न दोघांना पकडले.
त्यांच्याकडे असलेल्या गोणीत मृत हरीण सापडले. त्
यांच्याकडून नऊ बोअरची  बंदूक, सहा काडतुसे, एक वापरलेले काडतूस (पुंगळी) आणि दुचाकी जप्त करण्यात आली.
पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, अशोक नरुटे, पूजा काटे आदींनी कारवाई केली.
कारवाईसाठी ग्रामस्थ अतुल नरुटे, विनोद नरुटे, संदीप नरुटे यांनी सहकार्य केले.
वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे तपास करत आहेत.
वनविभागाचे आवाहन वन्यजीवांची तस्करी किंवा शिकार होत असल्याची माहिती असल्यास ग्रामस्थांनी त्वरित वनविभागाच्या जवळच्या कार्यालयास माहिती द्यावी किंवा हॅलो फॉरेस्ट टोल फ्री क्रमांक-१९२६ वर संपर्क साधावा.

Related Post

error: Content is protected !!