Thu. Apr 23rd, 2026

रेडणीत “कर्मवीर भाऊराव पाटील ” जयंतीचे आयोजन 

Spread the love

रेडणीत “कर्मवीर भाऊराव पाटील ” जयंतीचे आयोजन

सचिन तरंगे-कार्यकारी संपादक ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क ):

मौजे रेडणी येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात ‘पद्मभूषण डाँ कर्मवीर भाऊराव पाटील ‘यांचा 135 वा “जयंती सोहळा “आयोजित करण्यात आला आहे.

याबाबत चे अधिकृत निमंत्रण व आयोजन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. डब्ल्यू. जाधव (सर )यांनी दिले आहे.

रेडणी येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात मंगळवार दिनांक 27 सप्टेंबर 2022रोजी सकाळी 9:30 मिनिटांनी आयोजित केला आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मोहोळ विधानसभेचे आमदार यशवंत माने, आणि रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी चे सदस्य अमोल पाटील, तानाजीराव पाटील, भीमराव काळे, वंदना शेडगे, इ. मान्यवर तर प्रमुख वक्ते डाँ विकास शहा उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात यु. पी. एस. सी उत्तीर्ण विजय देवकाते, व ए. पी. आय राणी काळे यांचा सत्कार होणार आहे.

सदरच्या या महत्वपूर्ण कार्यक्रमास सर्व आजी,माजी विध्यार्थी, ग्रामस्थ, पालक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.

Related Post

error: Content is protected !!