कळंब येथे संतश्रेष्ठ सोपानकाका महाराज पालखीचे स्वागत , वालचंदनगर पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम संरक्षक दलाचे काम कौतुकास्पद 
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
संतश्रेष्ठ सोपानकाका महाराज पालखीचे ठिकठिकाणी रांगोळी काढत, स्वागत कमानी उभारत भव्य स्वागत कळंब येथे करण्यात आले. दरम्यान संतश्रेष्ठ सोपानकाका महाराज पालखी भवानीनगर, सणसर, बेलवाडी, लासुर्णे येथे मुक्काम आटपून कळंब हद्दीत प्रवेश केला. दरम्यान संतश्रेष्ठ सोपानकाका पालखीचे स्वागत करण्यासाठी कळंब परिसरातील मान्यवर भाविक ग्रामस्थ आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी महिलांनी रांगोळ्या काढून स्वागत केले. परिसरातील विद्यार्थ्यांनी पारंपारिक पहेराव करून लेझीम पथकासह स्वागत केले. कळंब करांच पिठलं भाकरीचा आस्वाद घेऊन पालखी निरवांगी मुक्कामासाठी मार्गस्थ झाली.
वालचंदनगर पोलीस स्टेशन अंतर्गत 39 गावातील ग्राम संरक्षक दल पथके यांनी वेळोवेळी ठिकठिकाणी हजर राहून आपली ड्युटी चोखपणे बंदोबस्तात केल्याने पंचक्रोशीतील नागरिकांत समाधान असल्याचे ग्राम संरक्षक दलाच्या मार्गदर्शिका व कळंब ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्या अश्विनी गणेश चव्हाण यांनी सांगितले. संरक्षक दलामुळे मोबाईल मौल्यवान वस्तूची चोरी करण्याचे प्रमाण कमी झाले आहे, कारण बंदोबस्त सतर्क असल्याने नागरिकांनी त्यांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले. त्यामुळे इथून पुढे गावातही कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता ग्राम संरक्षक दलावर पडली आहे. गावामध्ये प्रार्थना स्थळे पुतळे विधवा किंवा परित्यकता महिला यांना मदत करण्यासाठी ग्रामसुरक्षा दल सहभागी राहील, असे मत सहा फौजदार रतिलाल चौधर यांनी व्यक्त केले. तसेच भुरट्या चोरांना नक्कीच आळा बसेल,असे सहा.पोलीस निरीक्षक बी एन लातुरे यांनी सांगितले.
