२२ गावच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार – शरद पवार
संतोष भोसले ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
सोलापूर जिल्ह्यातील पक्षातील सहकारी यांचा गैरसमज दूर करून इंदापुर तालुक्यातील कायम दुष्काळी २२ गावांना विशेष जलतज्ञाचे मार्गदर्शन घेउन २२ गावच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार असल्याची माहिती जाहीर शेतकरी मेळाव्यात माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली
लाखेवाडी ( ता इंदापुर ) येथील दि ३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित विद्या निकेतन काॅलेज ऑफ फार्मसी, विद्या निकेतन स्कूल ऑन्ड ज्युनिअर काॅलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल या शैक्षणिक संकूल उदघाटन सोहळा आणी माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच जय भवानीगड विकास प्रतिष्ठित चे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेश व भव्य शेतकरी मेळाव्यात खासदार शरद पवार बोलत होते.
यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार पुढे म्हणाले की श्रीमंत ढोले व त्यांच्या कुटुंबियांनी शिक्षणक्षेञात जगात जी भाषा चालते त्या इंग्रजी भाषेतून शिक्षण देण्यासाठी शिक्षण संस्था उभी करून स्पर्धेत यश घेत आहेत असे सांगून म्हणाले की मी पण एक नव्हे तर अनेक शिक्षण संस्थांचा जबाबदार अध्यक्ष आहे त्यामुळे शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी यांना कुठल्याही उणीवा राहणार नाही याची काळजी घेतली तशीच काळजी श्रीमंत ढोले यांनी घेतली आहे याची कल्पना मला होती आणि याच उत्तम दर्जाच्या शिक्षण संकुलाचे उदघाटन माझ्या हास्ते झाले असे पवार यांनी जाहीर केले व पुढे बोलताना म्हणाले की मतदार संघातील लोकप्रतिनिधी हा जागृत असला पाहिजे तरच मतदार संघात विकास होतो राज्यमंत्री दत्ताञय भरणे यांनी जवळपास १२६० कोटींच्या माध्यमातून अनेक प्रकारचा विकास केला
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की बारामतीचा विकास हा विद्या प्रतिष्ठिन मुळे झाला तसाच लाखेवाडी गावचा विकास हा दर्जेदार शिक्षण संस्थेमुळे होणार आहे लाखेवाडी गावातील शिक्षण संस्थाने शिक्षणात दर्जात तडजोड न केल्यामुळे शेजारच्या शिक्षण संस्थेला अडचणी वाढली आहे
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की या तालूक्याचे माजी लोकप्रतिनिधी हे नेहमीच निवडणूक काळात उगीच लोकांना “हुल ” देतात सुरूवातीला सूतगिरणीचे स्वप्न दाखवून नंतर या गावातील माळरानावर बायोशुगर कंपनीची ” हूल ” दाखवली तर सहकारी संस्था कायम आपल्याच मतदान रहावे म्हणून सभासद करून न घेत नाहीत याबाबत लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, बाळासाहेब थोरात यांच्या सोबत चर्चा करून स्थनिक शेतकरी यांना सभासद करून घेण्यासाठी साखर आयुक्त यांचीही बैठक घेतली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली तर नव्याने पक्षप्रवेश करून आलेले श्रीमंत ढोले यांनी मागणी केलेली २२ खेड्यांना शेती पाणी हे मुळशी धरणातून पुण्यात घेउन पुणे व पिंपरी चिंचवड शहाराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवून उर्वरीत ४ ते ५ टीएमसी पाणी आपल्यातील सहकारी यांचा गैरसमज दूर करून ” शेतीचा पाणी प्रश्न ” मार्गी लावणार.
तसेच राज्याचे सामाजिक न्यायमंञी धनंजय मुंढे म्हणाले की २०१९ मधे माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यादेशात खरी लोकशाही आणली तर २०१९ मधील निवडणूकीत सतत शरद पवार यांचे तोडं भरून कौतुक करणारे आज त्याच्यामागे नक्कीच” ईडीची ” खुटी मारल्यामुळे पवार साहेब यांच्यावर टीका करत असल्याची माहिती राज ठाकरे यांचे नव न घेता दिली व पुढे म्हणाले सध्या “ईडी ” ची अवस्था ही ” ऊसतोड मजुरांच्या खिशातील बिडी सारखी झाली आहे .
यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की इंदापुर तालूक्याचा विकास होत आहे तसाच २२गावाच्या पाण्याच्याबाबत जो गैरसमज झाला तो दूर होईल.
तर राज्यमंत्री दत्ताञय भरणे म्हणाले की इंदापुर तालूक्याचा विकास करताना विरोधकांचा संन्मान करणे याचे शिक्षण मला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कडून मिळाले मी राज्याचा मंञी असलो तरी इंदापुरचा आमदार आहे त्यामुळे निश्चित मंञीपदाचा फायदा माझ्या मतदार संघात करणार व पुढे बोलताना म्हणाले तालूक्याचा विकास झाला आहे ” आता मात्र आपलेच सहकारी यांचे गैरसमज दूर करून माझ्या २२ गावाला शेतीचे पाणी द्यावे ” अशी मागणी खासदार शरद पवार याच्याकडे केली
या जाहीर शेतकरी मेळाव्यात माजी जिल्हा परिषद सदस्य व जय भवानीगड विकास प्रतिष्ठिन चे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांनी पक्षप्रवेश वेळी म्हणाले की मी भारतीय जनता पार्टी सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत प्रवेश करण्याचे कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून २२ दुष्काळी गावांना शेतीचे पाणी नाही या २२ गावाला शेतीचे पाणीसाठीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे अशी स्पष्टोक्ती दिली. यावेळी युवानेता दिपक जाधव यांनीही राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत प्रवेश करून आपले मनोगत व्यक्त केले तर रेडा गावातूनही ऑडव्होकेट तानाजी देवकर व ऑडव्होकेट योगेश देवकर यांचाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला.
या कार्यक्रमासाठी राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष प्रदिप गारटकर, आमदार यशवंत माने, आमदार संजयमामा शिंदे, पुणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष निर्मलाताई पानसरे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व वैशालीताई पाटील, दिपक दुर्गाडे, दौंड शुगर चे वीरधवल जगदाळे, रणजित शिवतारे, हर्षवर्धन खाडे ,प्रमिला खाडे, श्रीकांत दंडावते, शितल वनवे, दत्ता बाबर, सह आदी मान्यवर व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
सदरचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त सुजाता ढोले व मिराभाईधर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे प्रस्तावित चिञलेखा ढोले यांनी केले तर सुञसंचलन हे अनिल रूपनवर व स्वेता हुले यांनी केले आणी आभार राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे तालूका अध्यक्ष हानुमंत कोकाटे यांनी मानले.
