कळंब सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अभिजित खंडागळे तर व्हा.चेअरमनपदी रत्नमाला अर्जुन
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
दि. 14 रोजी कळंब विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित, कळंब येथील संस्था कार्यालयात चेअरमन व व्हा.चेअरमन पदाच्या निवडीचा कार्यक्रम पार पाडण्यात आला.
चेअरमन पदासाठी अभिजीत प्रल्हाद खंडागळे व व्हा.चेअरमन पदासाठी रत्नमाला बापुराव अर्जुन यांचे प्रत्येकी एकच अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध करण्यात येत असल्याचे निवडणूक अधिकारी जिजाबा गावडे यांनी घोषित केले.
यावेळी नुतन चेअरमन, व्हा.चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे निवडून आलेले सर्व 13 संचालक,अशोक पाटील ( भाऊ ), दत्तात्रय फडतरे, सुहास डोंबाळे, ज्ञानेश्वर खंडागळे, हनुमंत मोहिते आदी मान्यवर व संस्थेचे सचिव विजय जाधव, उमेश बुधावले, आबा अर्जुन उपस्थित होते.
