अतिरिक्त सह धर्मादाय आयुक्तांची नियुक्ती
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
पुणे विभागातील प्रलंबित न्यायिक प्रकरणांचा जलद निपटारा होण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार मुंबई येथील मुख्यालयातील श्रीमती सु. वि. तरार यांची पुणे येथे अतिरिक्त सह धर्मादाय आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. त्या महिण्यातील पंधरा दिवस म्हणजेच तिसरा व चौथा आठवडा पुण्यात कार्यरत असतील.
पुणे येथे विभागीय कार्यालय असल्याने सातारा, सोलापूर, अहमदनगर व पुणे अशा चार जिल्ह्यांचा कार्यभार आहे. अपिलीय कामकाज, ट्रस्ट मिळकती बाबत मनाई हुकूम, विश्वस्तांचे निलंबन , ट्रस्ट मिळकतींची विक्री परवानगी, कर्ज परवानगी इ. कामकाज पुणे कार्यालयातून केले जाते. कामकाजाची व्याप्ती प्रचंड असल्याने अतिरिक्त सह धर्मादाय आयुक्तांची नियुक्ती व्हावी ही वकील संघटनांची खूप दिवस मागणी होती. ती मान्य झाल्याने पक्षकार तसेच वकिलांमध्ये समाधानाची भावना आहे.
———————————-
अतिरिक्त सह धर्मादाय आयुक्तांची नियुक्ती झाल्याने न्यायदान प्रक्रिया जलद होऊन अंतिमतः पक्षकारांना त्याचा फायदा होईल. सद्या जरी चक्राकार पद्धतीने पंधरा दिवस नियुक्ती असली तरी कायमस्वरूपी नेमणूक व्हावी यासाठी प्रयत्नशील आहोत.
ॲड. शिवराज प्र कदम जहागिरदार
अध्यक्ष, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशन, पुणे
